मुंजाळ कन्येचे हायप्रोफाईल लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:46 IST2016-01-16T01:17:55+5:302016-02-07T07:46:59+5:30
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. राजधानी दिल्लीत मंगळवारी ज्येष्ठ उद्योगपती 'हिरोमोटो कॉर्प'चे अध्यक्ष पवन मुंजाळ यांची कन्या वसुधा हिचा विवाह निमंत्रित हायप्रोफाईल वर्हाडींच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला.

मुंजाळ कन्येचे हायप्रोफाईल लग्न
नववधू वसुधा ही चाकोला या चॉकलेट ब्युटिक शॉपची मालकीण आहे. देशभरात या कंपनीची अनेक शॉप आहेत. साहजिकच वेलवेटच्या आकर्षक चॉकलेटच्या बॉक्समधून दिलेल्या निमंत्रणपत्रिकेपासून त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली होती. तर, पंकज हॉवर्ड स्कूल ऑफ बिझनेसचा एमबीए आहे. आर्थिक सल्ला व सेवा देणार्या या फर्मचा देशात चांगलाच नावलौकिक आहे.
या खास शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उमर अब्दुल्ला, अरुण जेटली, सुनील मित्तल, बडी उद्योजक मंडळी, राजकीय नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले होते.