​अमेरिकेतील सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 05:53 IST2016-03-11T12:53:24+5:302016-03-11T05:53:24+5:30

‘ग्लासडोर’ने  एका सर्वेक्षणाच्या आधारे अमेरिकेतील सर्वाधिक कंपन्यांची यादी प्रकाशित केली आहे. 

Most Salary Jobs in America | ​अमेरिकेतील सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या

​अमेरिकेतील सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या

फिस, जॉब, बॉस या जाचापासून कोणाची सुटका आहे? इच्छा असो वा नसो, पोटापाण्याच्या भ्रांतीसाठी नोकरी करावी लागतेच. परंतु, गलेगठ्ठ पगार असेल तर स्वखूशीने नोकरीमध्ये येणारा सर्व त्रास हसत हसत सहन करू आपण. त्यामुळे तर अमेरिकेत जाण्याकडे सगळ्यांचा ओढा असतो. 

कंपनी रेटिंग साईट ‘ग्लासडोर’ने एका सर्वेक्षणाच्या आधारे अमेरिकेतील सर्वाधिक कंपन्यांची यादी प्रकाशित केली आहे. आश्चर्य म्हणजे कॉर्पोरेट नोकरी किंवा शेअर मार्केट ट्रेडर्सपेक्षा डॉक्टर आणि वकील अधिक पैसे कमावतात. 

डॉक्टरांना सरासरी वार्षिक १.८ लाख डॉलर्स एवढा पगार मिळतो. १.४४ लाख डॉलर्ससह दुसºया क्रमांकावर वकील आहेत. त्यानंतर रिसर्च आणि डेव्हेलोपमेंट मॅनेजर्सचा (१.४२ लाख डॉलर्स) नंबर येतो.

७५ पेक्षा जास्त सॅलरी रिपोर्टस्मधून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणाअंती ही यादी तयार करण्यात आली आहे. यामधून सीईओ लेव्हलचे जॉब वगळण्यात आलेले आहेत. तुमची वेळ निघून गेली असेल तर मुलांच्या करियरसाठी पुढील दहा जॉब्सचा विचार नक्कीच केला पाहिजे.

Doctor

1. डॉक्टर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($180,000)

2. वकील : सरासरी वार्षिक उत्पन्न ($144,500)

3. रिसर्च अँड डेव्हेलोपमेंट मॅनेजर : सरासरी वार्षिक उत्पन्न ( $142,120)

4. सॉफ्टवेअर डेव्हेलोपमेंट मॅनेजर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($132,000)

5. फार्मसी मॅनेजर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($130,000)

6. स्ट्रॅटेजी मॅनेजर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($130,000)

7. सॉफ्टवेअर आॅर्किटेक्ट : सरासरी वार्षिक उत्पन्न ($128,250)

8. इंटेग्रेटेड सर्किट डिजायनर इंजिनिअर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($127,500)

9. आयटी मॅनेजर : सरासरी वार्षिक उत्पन्न ($120,000)

10. सोल्युशन आॅर्किटेक्ट : सरासरी वार्षिक उत्पन्न ($120,000)

Web Title: Most Salary Jobs in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.