शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Met Gala 2019 : मेट गालामध्ये प्रियंका, दीपिकापेक्षाही ईशा अंबानीचीच चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 16:19 IST

न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2019 मधील आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोनच्या लूकच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2019 मधील आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोनच्या लूकच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आहेत. पण या फॅशन इव्हेंटमध्ये बिजनेसमन मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीचा लूकही विशेष गाजला. ईशा आपल्या लग्नानंतर पहिल्यांदाच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. 

बॉलिवूडचे सेलिब्रिटी आता हॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. अशातच इंडियाचे टॉप मोस्ट बिजनेसमॅन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ची मुलगी ईशा अंबानीच्याही अदा पाहायला मिळाल्या. ईशा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेटा गाला 2019 या फॅशन इव्हेंटमध्ये लाइट पिंक कलरच्या गाउनमध्ये दिसून आली. ईशा अंबानीचे या शोमधील फोटो प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी पोस्ट केले होते. ईशाचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये ईशा एखाद्या प्रिंसेसप्रमाणे दिसत आहे. 

ईशाने अत्यंत सुंदर लाइट पिंक कलरच्या वी नेक बाल गाउनमध्ये एन्ट्री केली. 

डिझायनर प्रबर गुरांगने ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर ड्रेसचे सर्व डिटेल्स शेअर केले होते. त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, 350 तासांमध्ये ईशाचा हा ड्रेस तयार करण्यात आला. 

गाउनवर क्रिस्टल हॅन्ड अम्ब्रॉयडरी आणि ऑस्ट्रिच फेदर यूज करण्यात आलं आहे. 

ईशाचा हा लूक कंप्लीट करण्यासाठी डायमंड ज्वेलरी आणि लाइट मेकअप करण्यात आला होता. ईशाचा स्मोकी आय मेकअप पूर्ण गेटअप परफेक्ट करण्यासाठी मदत करत होता. मेट गाला 2019 मध्ये यावेळी Camps: Notes on fashion ही थीम ठेवण्यात आली होती. सर्व सेलिब्रिटी ही थीम फॉलो करताना दिसून आले. 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानीने आपली लगीनगाठ मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आनंद पिरामल यांच्याशी बांधली आहे. याआधीही ईशा अनेक मोठ्या इव्हेंट्समध्ये अनेक क्लासी आणि डिफ्रंट आउटफिट्समध्ये दिसून आली. तिचा लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे ती अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

 दरम्यान, य इव्हेंटमध्ये प्रियंकाचं अद्भूत रूप पाहायला मिळालं. येथे प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनही पोहोचली होती. दोघींचाही लूक फार वेगळा होता.

प्रियंका चोप्राने तिसऱ्यांदा मेट गाला अटेंड केला आहे. तर लग्नानंतर पहिल्यांदा पती निक जोनाससोबत ती या इव्हेंटमध्ये उपस्थित राहिली. दोघांनीही लग्जरी ब्रँड डियोर (Dior) चे ड्रेस वेअर केले होते. 

टॅग्स :Isha Ambaniईशा अंबानीmet galaमेट गालाBeauty Tipsब्यूटी टिप्सDeepika Padukoneदीपिका पादुकोणPriyanka Chopraप्रियंका चोप्रा