मेस्सी-रोनाल्डोमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:32 IST2016-02-18T08:32:06+5:302016-02-18T01:32:06+5:30

लियोनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यातील चढाओढ आणि नंबर होण्याची स्पर्धा तर जगजाहीर आहे. 

Messi-Ronaldo jumped | मेस्सी-रोनाल्डोमध्ये जुंपली

मेस्सी-रोनाल्डोमध्ये जुंपली

ong>जगातील दोन महान आणि सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू लियोनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यातील चढाओढ आणि नंबर होण्याची स्पर्धा तर जगजाहीर आहे.

फुटबॉलच्या मैदानावर जेवढी अ‍ॅक्शन असते त्याहून शतपटीने अधिक मोठा संग्राम मैदानाबाहेर पाहायला मिळतो. बहुतांश वेळा हे सर्व मीडियाने फुगवलेला फुगा असतो. त्यात फारसे काही तथ्य नसते. परंतु दोघांच्या फॅन्ससाठी मात्र हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.

मेस्सीना विक्रमी पाचव्यांदा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा ‘बॅलॉन डि’आॅर’ (गोल्डन बूट) पुरस्कार पटकावला. ही सल ताजी असतानाच मेस्सीमुळे पुन्हा एकदा रोनाल्डोच्या पदरी निराशा पडली आहे.

ferrari

एका दैैनिकानुसार, एक आलिशान आणि महागडी कार विकत घेण्यासाठी दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. १९५८ साली क्युबन ग्रँड प्रिक्समध्ये इंग्लंडच्या स्टरलिंग मॉसने चालवलेली फेरारी ३३५ स्पायडर स्कॅग्लिएटी या कारसाठी दोघेही अडून बसले होते.

२२.५ मिलियन डॉलर्सपासून कारची बोली लागली. एकमेकांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी दोघेही जेरीस पेटले होते. एक एक करत किंमत वाढत गेली आणि अखेर मेस्सीने ३६ मिलियन डॉलर्स (सुमारे २४६ कोटी रुपये) एवढी किंमत मोजून कार स्वत:च्या ताब्यात घेतली.

ferrari

पुरस्कारही नाही आता कारही नाही म्हटल्यावर रोनाल्डोची स्थिती काय झाली असेल याचा अंदाज न केलेलाच बरा.

Web Title: Messi-Ronaldo jumped