या देशात मिळते पुरुषांना जनावरांप्रमाणे वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 04:48 IST2016-03-12T11:48:19+5:302016-03-12T04:48:19+5:30
येथील महिला स्वत:साठी पुरुष गुलाम म्हणून ठेवतात.

या देशात मिळते पुरुषांना जनावरांप्रमाणे वागणूक
तसेच त्यांना हवे तसे राबवूनही घेतात. या देशाची निर्मिती 1996 मध्ये युरोपियन देश चेक रिपब्लिकपासून झाली. येथे सत्ताधारी पॅट्रिसिया-1 ही या देशाची राणी आहे. तिचेच या संपूर्ण देशावर राज्य आहे. परंतु या प्रदेशाला इतर देशांनी देशाचा दर्जा दिला नाही.
मात्र ध्वज, चलन, पासपोर्ट व लष्करही त्यांचे आहे. तसेच याची ब्लॅक सिटी ही राजधानी आहे. येथील महिला या नागरिकांप्रमाणे आहेत. तर, पुरुषांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जाते. पुरुषांना या देशात गुलाम समजले जाते. त्यांना महिला राबवून घेतात. येथील आश्चर्य म्हणजे, विदेशी पुरुषांनी तयार केलेल्या आसनावरच महाराणी बसते.