अमेरिकन अभिनेत्री आणि ब्रिटिश रॉयल फॅमिलीची सदस्य प्रिंस हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल सध्या प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट असूनही मेघन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या पतिसोबत सहभागी होताना दिसून येते. एवढचं नाही तर मेघनची मॅटर्निटी स्टाइलही या दिवसांमध्ये फार व्हायरल होत आहे. तुम्हीही प्रेग्नंसीमध्ये मेगनपासून इन्स्पिरेशन घेऊन फॅशनेबल आणि स्टायलिश लूक मिळवू शकता. 

ब्राइट रेड ओवरकोट

पति प्रिंस हॅरीसोबत बर्केहेड मध्ये दिलेल्या भेटीदरम्यान मेगन पर्पल कलरच्या अर्टिजिया ड्रेसमध्ये दिसून आली. त्यावर मेगनने ब्राइट रेड कलरचा अत्यंत सुंदर ओवरकोट परिधान केला असून त्यासोबतच ब्राइट रेड कलरच्या ओवरकोटला मॅच करणाऱ्या पॉइंटेड हिल्स वेअर केल्या होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे, मेगनच्या छोट्या ब्राउन कलरच्या बॅगने. मेगनची ही  bowling बॅग गॅब्रिएला हर्ट्स्टची लेदर बॅग होती. या बॅगची किंमत 1 हजार 695 पाउंड म्हणजेच जवळपास दीड लाख रूपये होती. 

लाइट ब्राउन स्विंग कोट

जेव्हा मेगन मार्केलच्या प्रेग्नेंसीबाबत सांगायचे तर, मेगन नेहमीच ड्रेसवर ओवरकोट परिधान करताना दिसून येते. यावेळीही मेगन ब्लॅक कलरच्या midi ड्रेससोबत लाइट ब्राउन कलरच्या ऑस्कर डे ला रेंटा स्विंग कोटमध्ये दिसून आली होती. मेगनच्या या ब्लॅक midi ड्रेसची किंमत 218 डॉलर म्हणजेच जवळपास 15 हजार 500 रुपये होती. 

मेगन का ऑल ब्लॅक लूक

ख्रिसमस फेस्टिव्हलच्या दिवशी चर्च सर्व्हिस दरम्यान प्रिंस हॅरी आणि मेगन मार्केल दोघेही ब्लॅक लूकमध्ये दिसून आले. यादरम्यान मेगनने ब्लॅक कलरचा ड्रेस आणि ब्लॅक कलरचा ओवरकोट परिधान केला होता. ज्यावर गोल्डन कलरचे बटन्स लावले होते. त्याचबरोबर मॅचिंग स्टूअर्ट विट्जमन बूट्स, फिलिप ट्रीसी ब्लॅक हॅट आणि ब्लॅक कलरची छोटीशी हॅन्डबॅग मॅच केली होती. मेगनचा हा लूकही फार चर्चेत होता. 

फ्लोरल ड्रेससोबत मॅक्सी कोट

रॉयल वरायटी चॅरिटी इव्हेंटच्या दरम्यान मेगन दिसून आली ग्रे कलरच्या मॅक्सी कोटमध्ये. ज्याखाली मेगनने फ्लोरल प्रिंट असलेला ब्रॉक कलेक्शन असलेला ड्रेस वेअर केला होता. त्यासोबतच तिने स्टायलिशे क्लच सोबत ठेवला होता. या फोटोमध्ये मेगनचा बेबी बंप आणि तिच्या चेहऱ्यावरील ग्लो दिसून येत होता. 

वाइन कलरचा ओवरकोट

आणखी एका इव्हेंटमध्ये मेगन मर्केलने वाइन कलरच्या कॉलर असलेल्या ड्रेसवर वाइन कलरचाच क्लब मोनॅको डेलीना ओवरकोट परिधान केला होता. यादरम्यान मेगनने अॅश ब्लॅक कलरचे डिझायनर शॉर्ट बूट्स परिधान केले होते. या सिम्पल लूकमध्येही स्टायलिश दिसत होती मेगन. 

Web Title: Meghan markles pregnancy style and look are fashionable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.