मार्क जुकरबर्गची चीनमध्ये जॉगिंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 20:46 IST2016-03-19T03:46:56+5:302016-03-18T20:46:56+5:30
फेसबुकचा सहसंस्थापक मार्क जुकरबर्ग शुक्रवारी पहाटे मार्क बीजिंगच्या प्रसिद्ध थियानमेन स्क्वेअरजवळ जॉगिंग करताना दिसला

मार्क जुकरबर्गची चीनमध्ये जॉगिंग...
फ सबुकचा सहसंस्थापक मार्क जुकरबर्गने शुक्रवारी आपला हा फोटो फेसबुकवर शेअर केला. बरोबर ओळखलतं!! मार्कचा हा फोटो आहे चीनमधला. शुक्रवारी पहाटे मार्क बीजिंगच्या प्रसिद्ध थियानमेन स्क्वेअरजवळ जॉगिंग करताना दिसला. स्मॉगी वातावरण असूनही त्याने मास्क न घालता जॉगिंग केले. अनेकांनी इतक्या प्रदूषणातही मास्कविना जॉगिंग केल्याबद्दल मार्कला विचारले. पण सासुरवाडीत कसले आले प्रदूषण? नाही कळले ना? अहो, मार्कची पत्नी प्रिसिला चीनची आहे, ठाऊक नाही हो, तुम्हाला!!! बीजिंगमध्ये इकॉनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी मार्क इथे आला होता.