इंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्याचा पाठलाग....पण शोधण्यात अपयशी, माल्याचे पुन्हा ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 01:19 IST2016-03-13T08:19:07+5:302016-03-13T01:19:07+5:30
भारताबाहेर गेल्यानंतर विजय माल्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे

इंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्याचा पाठलाग....पण शोधण्यात अपयशी, माल्याचे पुन्हा ट्विट
भ रताबाहेर गेल्यानंतर विजय माल्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रविवारी माल्याने एका ट्विटमध्ये लिहिले की, इंग्लंडमध्ये मीडिया माझा पाठलाग करीत आहे. पण त्यांना योग्य जागा सापडत नाही, हे दु:ख आहे. मी मीडियाबरोबर बोलणार नाही. त्यामुळे परिश्रम करू नका. देश सोडण्याबाबत माल्यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते, की त्यांनी मी पळकुटा नाही असे लिहिले होते.