लठ्ठ पुरुषांचे एकापेक्षा अधिक महिलांशी संबंध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:38 IST2016-01-16T01:19:52+5:302016-02-12T05:38:27+5:30

६00५८ लोकांच्या सर्व्हेतून हाती आलेला निष्कर्ष वेल टोनड् बॉडीचे वेड सर्वांनाच असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू असतो.

Malatha men have more than one relationship with women! | लठ्ठ पुरुषांचे एकापेक्षा अधिक महिलांशी संबंध!

लठ्ठ पुरुषांचे एकापेक्षा अधिक महिलांशी संबंध!

 
रंतु आता वजन कमी करण्याला आणखी एक कारण मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांचे एकापेक्षा अधिक महिलांसोबत लैंगिक संबंध असू शकतात.
सरासरी ३७ वर्षे वयोमानाच्या ६00५८ लोकांचा यामध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यातून असे दिसून आले की त्यांचे सरासरी आठ सेक्शुअल पार्टनर्स आहेत. पुरुषांचे बॉडी-मास इंडेक्सचा (बीएमआय) अभ्यास केल्यावर जाणवले की जास्त वजन असलेल्या पुरुषांचे कमी वजन असलेल्या पुरुषांच्या तुलनेत अधिक महिलांसोबत लैंगिक संबंध असतात. कॅलिफोर्निआ येथील चॅम्पॅन विद्यापीठाचे सहप्राध्यापक डेव्हिड फ्रेडरिक यांनी हे सर्वेक्षण केले आहे. ते म्हणतात, 'वजन आणि लैंगिक वर्तणूक यांचा संबध शोधण्यासाठी आम्ही हे अध्ययन केले. यामुळे अनेक मजेशीर बाबी समोर आल्या. सगळे जण लठ्ठपणाला कमीपणा मानतात; पण उलट लैंगिक सुखाच्या बाबतीत ते इतरांपेक्षा जास्त सक्रि य असतात.' बरं लठ्ठपणाची वैद्यकीय परिभाषा ही सामान्यत: आपण जसे लठ्ठ मानतो त्यापेक्षा वेगळी असते. कमी वजन असणार्‍या महिलांचे जास्त वजन असलेल्या महिलांपेक्षा कमी लैंगिक जोडीदार असतात.

Web Title: Malatha men have more than one relationship with women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.