मलायका अरोराबॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस स्टार्सपैकी एक. मलायका आणि तिचे क्लासी लूक्स अनेक अनेक तरूणी फॉलो करताना नेहमीच दिसून येत असतात. मलायकाच्या आउटफिट्स आणि लूक्स नेहमीच क्लासी आणि ट्रेन्डी असतात. सध्या मलायका आपले सेक्सी जिम आउटफिट लूक, हॉलिडेचे फोटो आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. पण फक्त जिम आउटफिट्सच नाही तर मलायकाचा रेड कार्पेट लूक किंवा कॅज्युअल लूक आणि एवढचं नाहीतर तिचा एअरपोर्ट लूकही हटके असतो. 

मलायकाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे, ती एकीकडे महागडे लग्जेरिअस ब्रँडचे कपडे आणि एक्सेसरीज फ्लॉन्ट करताना दिसून येते. परंतु दुसरीकडे ती असे कपडे पसंत करते जे, सामान्य माणसांसाठी पूर्णपणे अफॉर्डेबल असतील आणि बजेटमध्येही असतील. मलायका जे आउटफिट्स वेअर करते, ते पूर्ण कॉन्फिडन्सने कॅरी करते. 

मागील काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर मलायका स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने ऑफ शोल्डर सेक्सी स्वेटशर्ट वेअर केलं होतं. ज्यावर फ्रंट साइटला हॉर्सचा लोगो होता. मलायकाने वेअर केलेलं हे स्वेटशर्ट Wrangler कंपनीचं होतं. खरं तर हे स्वेटशर्ट पुढिल बाजूने यल्लो आणि बॅक साइटने ब्लू कलरचं होतं. हे स्वेट शर्ट मलायकाने ब्लॅक कलरची पॅन्ट, व्हाइट स्पोर्ट्स शूज आणि स्क्वेअर शेप्ड ब्लॅक सनग्लासेज सोबत टिमअप करून वेअर केलं होतं. 

खास गोष्ट म्हणजे, या Wrangler स्वेटशर्टची किंमत 79 डॉलर म्हणजेच, जवळपास 5 हजार 440 रूपये आहे. म्हणजेच, तुम्हीही हे स्वेटशर्ट खरेदी करू शकता आणि मलायकाप्रमाणे लूक कॅरी करू शकता. 

पाहा तिचे आणखी क्लासी आउटफिट्स : 

Web Title: Malaika arora sexy yellow sweatshirt is totally in your budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.