पन्नाशीनंतरही माधुरीच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात नवख्या अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 17:18 IST2019-02-01T16:51:32+5:302019-02-01T17:18:58+5:30
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे लाखो तरूणांचा प्राण असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. माधुरीच्या एका फक्त हास्यानेच अनेक चाहते घायाळ होत असतात.

पन्नाशीनंतरही माधुरीच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात नवख्या अभिनेत्री
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे लाखो तरूणांचा प्राण असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. माधुरीच्या एका फक्त हास्यानेच अनेक चाहते घायाळ होत असतात. 51व्या वर्षी आपलं सौंदर्य, ग्रेस आणि एलिगेंसमुळे माधुरी आजही अनेक नवख्या अभिनेत्रींना कॉम्प्लेक्स देत असते. एवढचं नाही तर आजही माधुरी आपल्या फॅशनेबल आणि स्टायलिश फोटोंमधून नवीन जनरेशनला फॅशन गोल्स देताना दिसून येते.
माधुरी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव्ह असून आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. एथनिक वेअर असो किंवा वेस्टर्नवेअर, कोणत्याही लूकमध्ये माधुरी फार सुंदर दिसते.
काही दिवसांपूर्वी माधुरी डार्क ब्ल्यू आणि न्यूड कलरच्या फ्लोअर लेंथ गाउनमध्ये दिसून आली होती. या गाउनवर एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्क केलं होतं. अक्सेसरीजबाबत सांगायचे तर माधुरीने या आउटफिटवर व्हाइट आणि ब्ल्यू कलरचे इयररिंग्स मॅच केले होते. केसांची कोणतीही हेअरस्टाइल न करता तिने केस मोकळे सोडले होते.
बराच दिवसांनंतर अनिल कपूरसोबत माधुरी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी चित्रपट टोटल धमालमध्ये दिसणार आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी माधुरीने व्हाइट कलरची फॉर्मल वाइड लेग्ज पॅन्ट आणि यलो कलरचा स्लीव्हलेस टॉप वेअर केला होता.
डार्क ब्लू, मस्टर्ड आणि ब्लॅक कलरच्या लॉन्ग ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत होती माधुरी...
फक्त वेस्टर्नच नाही तर ट्रेडिशनल अटायरमध्येही सुंदर दिसते माधुरी. मग ती साडी असो किंवा लेहेंगा किंवा मग अनारकली..... प्रत्येक प्रकारच्या एथनिकवेअर लूकमध्येही सुंदर दिसते माधुरी...
पाहा आणखी काही माधुरीचे फोटो :