शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमधील स्पर्धक चित्रपटांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:34 IST

इंडिपेंडंट चित्रपटांचे माहेरघर म्हणून सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची ओळख आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात...

इंडिपेंडंट चित्रपटांचे माहेरघर म्हणून सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची ओळख आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील पार्क सिटी, उटाह येथे होणार्‍या या चित्रपट महोत्सवात जगभरातील इंडिपेंडंट दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवण्यात येतात. जानेवारी २0१६ मध्ये होणार्‍या महोत्सवात दाखविण्यात येणार्‍या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. गुलामगिरीवर भाष्य करणार्‍या चित्रपटांपासून ते समलैंगिक लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकणार्‍या दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.महोत्सवाचे प्रोग्राम डिरेक्टर जॉन कूपर यांनी माहिती दिली की, अमेरिका आणि इतर अनेक देशांतील चित्रपटांची निवड यासाठी करण्यात आली आहे. इंडिपेंडंट सिनेमांची निर्मिती आता वाढू लागली आहे. मोठय़ा स्टुडिओज्ची मक्तेदारी मोडून नव्या आवाजांना, नव्या कथांना लोकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हे फिल्ममेकर्स करत आहे. सनडान्स त्यांना व्यासपीठ मिळवून देते.महोत्सवाचे यावेळी खास आकर्षण म्हणजे गुलामगिरीवर आधारित ऐतिहासिक चित्रपट 'द बर्थ ऑफ अ नेशन' हे आहे. नेट पार्कर याने याचे दिग्दर्शन केले आहे. त्याबरोबरच कोरियाहून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पीढीचा सांस्कृतिक संघर्ष 'स्पा नाईट'मधून दिसणार आहे. विविध विषयांवरील अनेक डॉक्युमेंटरीज्सुद्धा यावेळी पाहायला मिळणार आहेत.