जान्हवी कपूरकडून शिका; लेहेंग्यामध्येही सुंदर दिसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:00 IST2018-10-04T16:59:37+5:302018-10-04T17:00:36+5:30

जान्हवी कपूरने दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला वहिला चित्रपट  'धडक'च्या प्रमोशनदरम्यान तिने घातलेल्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं.

learn the style of carrying lehanga from jahnvi kapoor | जान्हवी कपूरकडून शिका; लेहेंग्यामध्येही सुंदर दिसा!

जान्हवी कपूरकडून शिका; लेहेंग्यामध्येही सुंदर दिसा!

जान्हवी कपूरने दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला वहिला चित्रपट  'धडक'च्या प्रमोशनदरम्यान तिने घातलेल्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. असंही म्हटलं जातं की, जान्हवीने आपल्या स्टायलिश एथनिकवेअरचा नवीन ट्रेन्ड सेट केला. 

जान्हवीने परिधान केलेला पिंक क्रॉप टॉप आणि लहेंगा तिला एक वेगळा लूक देत आहे. एवढचं नाही तर या लेहेंग्यासोबत तिने फ्लोर लेन्थ जॅकेट वेअर केला होता. 

जान्हवीने परिधान केलेल्या ब्लॅक लेहेंग्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती. त्यासोबत तिने केलेली हेअर स्टाइलमुळे या लेहेंग्याचा लूक आणखी बहरत होता. 

लेहेंगा किंवा स्कर्ट परिधान केल्यानंतर सर्वात कमी भासते ती म्हणजे पॉकेटची जान्हवीने घातलेला हा लेहेंगा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यास मदत करेल.

जर तुम्हाला ड्रेसवर फ्रिल फार आवडत असतील, तर जान्हवीचा हा वेस्टर्न लूक देणारा लेहेंगा तुम्ही ट्राय करू शकता. 

सोनम कपूरच्या लग्नामध्ये जान्हवीने हा मल्टीकरल लेहेंगा परिधान केला होता. तुम्हीही एखाद्या समारंभासाठी जान्हवीचा हा लेहेंगा ट्राय करू शकता. 

Web Title: learn the style of carrying lehanga from jahnvi kapoor