​गेल्या वर्षी १३०० गेंड्यांची विक्रमी कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 03:08 IST2016-03-10T10:08:59+5:302016-03-10T03:08:59+5:30

२०१५ मध्ये आफ्रिकेत १३३८ गेंड्यांची बेकायदेशीररीत्या कत्तल झाली आहे.

Last year, the record of 1,300 rhymes was slaughtered | ​गेल्या वर्षी १३०० गेंड्यांची विक्रमी कत्तल

​गेल्या वर्षी १३०० गेंड्यांची विक्रमी कत्तल

ाडीची संवर्धन संस्था ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झरवेशन आॅफ नेचर’ने (आययूसीएन) दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये आफ्रिकेत १३३८ गेंड्यांची बेकायदेशीररीत्या कत्तल झाली आहे. २००८ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये गेंड्यांच्या शिंगाच्या तस्करीवर बंदी घालण्यात आली होती.

लगातार सहावर्षांपासून आफ्रिकेत गेंड्यांची शिकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. २००८मध्ये बंदी घातल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गेंड्यांची शिकार झाली आहे.

शिंगातील वैद्यकीय गुणवैशिष्ट्यांमुळे चीन आणि व्हिएतनाम येथून त्यांची मागणी वाढत असल्यामुळे शिकारीच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती ‘आययूसीएन’ने दिली.

गेंड्यांचे शिंग आपल्या नखांप्रमाणे ‘केरॅटिन’पासून बनलेले असते. कॅन्सर आणि इतर आजारांवर उपचार म्हणून शिंगापासून तयार करण्यात आलेल्या पावडरची मोठ्या प्रमाणत विक्री होते.

Rhino Horn

शिंगाची तस्करी रोखण्यासाठी १९७७ मध्ये ‘सीआयटीईएस’ने बंदी घातली होती. मात्र, आफ्रिकेत २००८मध्ये ती लागू झाली. जगातील सुमारे ८० टक्के गेंडे (वीस हजार) आफ्रिकेत राहतात.

Web Title: Last year, the record of 1,300 rhymes was slaughtered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.