​केआरके कन्हय्या कुमारला देणार दोन लाखांचे बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 10:15 IST2016-03-04T17:15:27+5:302016-03-04T10:15:27+5:30

आपल्या रोज नव्या आचरट व वादग्रस्त कमेन्ट्सनी अनेक बॉलिवूड कलाकारांचा रोष ओढवून घेणारा बॉलिवूड अभिनेता कमाल खान जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याला दोन लाखांचे बक्षिस देणार आहे.

KRK to give Rs 2 lakh prize to Kanhaiya Kumar | ​केआरके कन्हय्या कुमारला देणार दोन लाखांचे बक्षिस

​केआरके कन्हय्या कुमारला देणार दोन लाखांचे बक्षिस

ल्या रोज नव्या आचरट व वादग्रस्त कमेन्ट्सनी अनेक बॉलिवूड कलाकारांचा रोष ओढवून घेणारा बॉलिवूड अभिनेता कमाल खान जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याला दोन लाखांचे बक्षिस देणार आहे.


आपल्या टिष्ट्वटर हँण्डलवर कमालने ही घोषणा केली. कन्हय्या कुमारला अलीकडे देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. काल-परवाच तो जामीनावर सुटला आणि कारागृहातून बाहेर येताच त्याने विद्यापीठात दमदार भाषण ठोकले. आम्ही भारतापासून नाही तर भारतात स्वातंत्र मागत आहोत. आम्हाला भूक, भ्रष्टाचार, भेदभावापासून स्वातंत्र्य हवे आहे,अशा घोषणा देणारे कन्हय्याचे भाषण देशभर चांगलेच गाजले. कमाल खानही कन्हय्याचे हे भाषण ऐकून भारावून घेला आहे. इतका की, कन्हय्याच्या दमदार भाषणासाठी मी त्याला दोन लाख रुपए बक्षिस देणार आहे, असे त्याने जाहिर करून टाकले. 

Web Title: KRK to give Rs 2 lakh prize to Kanhaiya Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.