Kiara advanis cutout midi dress price will leave you awestruck | चित्रपटाऐवजी कियारा अडवाणीच्या ड्रेसचीच चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्

चित्रपटाऐवजी कियारा अडवाणीच्या ड्रेसचीच चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टार कास्ट असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत चित्रपटाने 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कियारा अनेक वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसून आली. पण या सर्व आउटफिट्सपैकी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, कियाराचा मीडी ड्रेस.

आपल्या चित्रपटाने केलेल्या भरघोस कमाईमुळे कियारा आणि शाहिद एकत्र पार्टि करण्यासाठी भेटले होते. या पार्टिसाठी कियाराने हा मीडी ड्रेस वेअर केला असून जो थाय हाय स्लिट असण्यासोबतच मिड-रिफजवळ कटआउटही होता. 

चर्चेचा विषय ठरलेला कियाराचा हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिजाइन केलेला होता. कियाराच्या लूकबाबत बोलायचे झाले तर तिने आपला लूक फार सिम्पल ठेवला होता. कियाराने हाय पोनीटेल, नो अक्सेसरीज आणि लाइट मेकअप केला होता. 

प्रबल गुरुंगने डिझाइन केलेल्या कियाराच्या या मीडी ड्रेसची किंमत 1077 डॉलर म्हणजेच, जवळपास 74 हजार रूपये होती. कियाराच्या फुटवेअर्सबाबत बोलायचे झाले तर तिने या चेकर्ड ड्रेससोबत क्रिस्चियन लुईबुटिनचा न्यूड कलरचे पंप स्टाइल शूज वेअर केले होते. 

Web Title: Kiara advanis cutout midi dress price will leave you awestruck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.