ऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:00 IST2019-08-11T12:45:45+5:302019-08-11T13:00:21+5:30
कधी पिंक साडी आणि डीप क्लीवेज ब्लाउजमध्ये करिनाचा सेक्सी अंदाज पाहायला मिळतो तर कधी वन स्लीव्स ब्लॅक पॅन्टसूटमध्ये बॉस लेडी लूकमध्ये ती क्लासी दिसून येते. सध्या करिना आपली फॅशन आणि स्टाइल्समुळे चाहत्यांना भूरळ घालत आहे. पाहूयात करिनाचा लेटेस्ट लूक...

ऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज
बॉलिवूडची फॅशन क्वीन, फॅशनिस्ता आणि फॅशन आयकॉन अशा गोष्टींची जेव्हा होते, तेव्हा या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव करिना कपूरचं येतं. करिनाने बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेन्ड सेट केले आहेत. बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेन्ड करिनानेच रूढ केला. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, कॅज्युअल लूक असो किंवा हॉलिडे लूक. सर्वांमध्ये ती फार हटके आणि क्लासी दिसते.
जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, त्यावेळी जास्तीत जास्त लोक बॉलिवूड सेलिब्रिटींना आपला फॅशन आयकॉन मानतात आणि त्यांनाच फॉलो करतात. असचं काहीसं बॉलिवूडची फॅशन आयकॉन असलेल्या करिनाबाबतही असतं. सध्या करिना एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून सहभागी झाली आहे. त्या कार्यक्रमातून करिना आपल्या फॅन्सना आणि फॉलोअर्सना फॅशन गोल देत आहे.
कधी पिंक साडी आणि डीप क्लीवेज ब्लाउजमध्ये करिनाचा सेक्सी अंदाज पाहायला मिळतो तर कधी वन स्लीव्स ब्लॅक पॅन्टसूटमध्ये बॉस लेडी लूकमध्ये ती क्लासी दिसून येते. सध्या करिना आपली फॅशन आणि स्टाइल्समुळे चाहत्यांना भूरळ घालत आहे. आज आपण तिचा लेटेस्ट लूक पाहूयात...
करिनाचा ऑरेंज लूक यावेळी चर्चेचा विषय ठरत आहे. ऑरेंज कलरचा ड्रेस आणि नो अक्सेसरीज लूकमध्ये करिना फार सुंदर दिसत होती.
करिनाने फार सुंदर वन शोल्डर ड्रेस वेअर केला होता. ज्यामध्ये स्लीव्स फुल होते पण मिडरिफजवळ असलेला कटआउट आणि थाई-हाई स्लीव्स ड्रेसमध्ये उठून दिसत होतं. हा ड्रेस करिनाने ब्लॅक कलरच्या पीप-टो हिल्ससोबत टिमअप करून वेअर केला होता.
पाहूयात करिनाचे आणखी काही ग्लॅमरस फोटो :
मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिनाने केला नववधू साज
दरम्यान, बॉलिवूडची ट्रेन्ड सेटर म्हणून ओळख असणाऱ्या करिनाच्या स्टायलिश लूक्सची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते.