लेखनासाठी सोडली नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:58 IST2016-01-16T01:09:19+5:302016-02-06T07:58:39+5:30

प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांना साहित्यातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार नुकताच मिळाला. त्यानिमित...

Job opportunity left for writing | लेखनासाठी सोडली नोकरीची संधी

लेखनासाठी सोडली नोकरीची संधी

रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांना साहित्यातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार नुकताच मिळाला. त्यानिमित्तानं त्यांच्या मातोश्री लैला यांनी विक्रम यांच्या बालपणीच्या स्मृतींना उजाळा दिला. विक्रम यांचं शिक्षण ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात झालं. ते शिष्यवृत्ती विजेते विद्यार्थी होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली, तेव्हा त्यांना जागतिक बँकेकडून नोकरीचा प्रस्ताव आला. त्यांचे वडील प्रेम आणि आईनं त्यांना ही नोकरी पाच वर्षांपर्यंत केल्यास नवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल,असा सल्ला दिला. त्यानंतर विक्रम यांनी उर्वरित आयुष्यभर काव्यलेखन करावं, असंही त्याला सुचवलं. पण विक्रम यांनी त्यांना सांगितले, की नोकरी केल्यास सोनसाखळ्य़ांच्या बंधनात मी अडकेल. माझ्या प्रतिभाशक्तीचं त्यामुळे नुकसान होईल व मी काव्यलेखन करू शकणार नाही. विक्रम यांनी आपल्या आई-वडिलांना आपल्या निर्णयाला पाठिंबा देण्यास सांगितले. विक्रम यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी आपल्या आई-वडिलांशी प्रसंगी वादही घातला. विक्रम यांच्या शिक्षणासाठी तीन वर्षे त्यांना पाठिंबा देण्यास आई-वडिलांनी मान्य केले. प्रत्यक्षात त्यांना शिक्षणासाठी सात वर्षे लागली. तरीही त्यांच्या आई-वडिलांनी कोणतीही तक्रार केली नाही. या काळात त्यांनी त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी 'अ सुटेबल बॉय' लिहिली व त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

Web Title: Job opportunity left for writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.