मेंदूच्या संरचनेवर अवलंबून असते बुद्धिमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:15 IST2016-01-16T01:20:05+5:302016-02-08T06:15:57+5:30

काही लोक इतरांपेक्षा फार हुशार असतात. पण, तेच नेमके का हुशार असतात, असा प्रश्न आपल्याला नेहमी सतावत...

Intellect depends on the structure of the brain | मेंदूच्या संरचनेवर अवलंबून असते बुद्धिमत्ता

मेंदूच्या संरचनेवर अवलंबून असते बुद्धिमत्ता

 
ा प्रश्नाची उत्सुकता शमविण्यासाठी वैज्ञानिकांनी यामागचे कारण शोधले आहे. त्यांच्या मते, मेंदूची संरचना आणि बुद्धिमत्ता यांचा परस्पर संबंध असतो. जास्त हुशार लोकांच्या मेंदूची संरचना ही कमी हुशार लोकांच्या मेंदूच्या संरचनेपेक्षा वेगळी असते. व्यक्तिमत्त्व, हुशारी आणि मेंदूच्या शारीरिक संरचने संबंधीचे हे पहिलेच संशोधन आहे.
यामध्ये शेकडो निरोगी लोकांच्या मेंदूच्या विविध भागांचा एकमेकांशी असणार्‍या समन्वयाचा अभ्यास करण्यात आला. ज्या व्यक्तींच्या मेंदूची संरचना चांगल्या प्रकारची असते ते व्यक्ती जीवनात जास्त यशस्वी असतात. मेंदूच्या भागांच्या समन्वयावर शब्दसाठा, स्मरणशक्ती, समाधान, उत्पन्न आणि शिक्षण या गोष्टी थेट अवलंबून असतात.
अपुर्‍या समन्वयामुळे व्यक्तिमध्ये व्यसन, राग, बंडखोरी, निद्रानाशासारखे नकारात्मक गुण वाढतात. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन स्मिथ सांगतात की, 'आपली वागणूक, वृत्ती आणि मेंदूची संरचना, समन्वय यांचा संबंध काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. यावेळी मेंदूचे कार्य कसे चालते याचा आम्ही अभ्यास केला.' स्मिथ यांनी 'नेचर न्युरोसायन्स' मध्ये त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे.

Web Title: Intellect depends on the structure of the brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.