भारताचा पारंपारिक पेहराव म्हणजे साडी. महिलांचं खरं सौंदर्य हे साडीतच दिसत असं आपण अनेकदा ऐकतो. पण सध्या साडीचं रूप बदललेलं दिसतं. अनेक महिला तसेच बॉलिवूडसेलिब्रिटी या साड्या वेगवेगळ्या स्वरूपात घालण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्हीही सध्या ट्रेन्डमध्ये असणारे साड्यांचे हे वेगवेगळे ट्रेन्ड फॉलो करू शकता.
हॅपी फिर भाग जाएगीच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री डायना पिंटो साडीमध्ये दिसली होती. परंतु तिने घातलेली साडी पारंपारिक साडीपेक्षा फार वेगळी होती. बटण असणाऱ्या साडीसोबत डायनाने पलोझो स्टाइल ट्राउझर घातली होती. त्यासोबतच यूज करण्यात आलेला ड्रेप्ट फॅब्रिक ड्रेसमुळे साडीचा लूक येत होता. डिझानर्सच्या मते, लाल, ब्लॅक आणि बेज रंगाची पलाझो साडी मेहंदी सेलिब्रेशनपासून एगेजमेंट पार्टीसाठी परफेक्ट लूक देतात.
अनेक बॉलिवूड अभिनेत्री साड्यांसोबत एक्सप्रिमेंट करताना आपल्याला दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राही एका कार्यक्रमामध्ये पलाझो साडीमध्ये दिसून आली होती. व्हाइट कलरचा ऑफ शोल्डर ब्लाउज आणि त्यासोबत पल्लू असलेली पलाझो परिणीतीला एक खास लूक देत होती.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक सोहळ्यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एका डिझायनर साडीचं प्रमोशन करताना दिसून आली. साडी आणि जम्पसूटचं हे कॉम्बिनेशन फार सुंदर दिसत होतं. या लूकमध्ये सुष्मिता फार सुंदर दिसत होती.
फॅशन डिझायनर अमित अग्रवालने डिझाइन केलेल्या हायब्रिड साडीमध्ये मलायका फार सुंदर दिसत होती. मरून आणि ब्लॅक कलरच्या या कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये पेटिकोटशिवाय नेसण्यात आली आहे. यामध्ये साडी धोतराप्रमाणे नेसवण्यात येते. मलायकाचा हा लूक डिफ्रंट दिसण्यासोबतच तिला एक हटके लूक देण्यास मदत करतोय.
![]()
बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर अनेकदा ट्रेडिशनल साड्यांमध्ये दिसून येते. सोनम नेहमी आपल्या हटके स्टाइलमध्ये दिसून येते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीही साड्यांसोबत अनेक एक्सप्रिमेंट करताना दिसून येते. कधी गाउन स्टाइलमध्ये तर कधी पलाझो टाइपमध्ये ती साडी नेसते.