​उतावळेपणामुळे वाढते वार्ध्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:52 IST2016-02-24T08:52:41+5:302016-02-24T01:52:41+5:30

नवीन रिसर्चनुसार ज्या महिला जास्त अधीर असतात त्यांना वार्ध्यक लवकर येते.

Increasingly due to aggravation | ​उतावळेपणामुळे वाढते वार्ध्यक

​उतावळेपणामुळे वाढते वार्ध्यक

णत्या मुलीला आजीवन तरुण राहायला आवडणार नाही. त्यासाठी वाढत्या वयाबरोबर चेहºयाचा उजळपणा टिकवण्यासाठी कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग केला जातो. पण नवीन रिसर्चनुसार ज्या महिला जास्त अधीर असतात त्यांना वार्ध्यक लवकर येते.

सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी केलल्या संशोधनातून असे दिसून आले की, तरुण चीनी मुली ज्या अधीर किंवा उतावळेपणा ज्यांच्यामध्ये जास्त आहे, त्या शांत स्वभावाच्या महिलांच्या तुलनेत जास्त लवकर म्हाताºया होतात.

यासाठी त्यांनी 1158 चीनी अंडर गॅ्रज्युएट मुलींचा अभ्यास केला.  इकोनॉमिक गेम ‘डिलेय डिस्काउंटिंग’ द्वारे मुलींमधील ‘अधीरपणा’ मोजण्यात आला. त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला उद्या शंभर डॉलर्स हवेत किंवा काही दिवसांनंतर त्याहुन अधिक जास्त बक्षीस पाहिजे. ज्यामुलींनी शंभर डॉलर्स पाहिजे असे सांगितले त्या अधीर असे मानण्यात आले.

सहभागी मुलींच्या ल्युकोसाईट टेलोमिर्सची लांबी मोजण्यात आली. ल्युकोसाईट टेलोमिर्स म्हणजे डीएनएच्या टोकावर असणारी टोपी जी क्रोमोझोमचे रक्षण करते. पेशी विभाजन आणि वाढत्या वयोमानात टेलोमिर्सची लांबी घटते.

Web Title: Increasingly due to aggravation