‘इम्रान’की किस्मत में तलाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:14 IST2016-01-16T01:13:51+5:302016-02-06T13:14:34+5:30
माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी इम्रान खानचा दुसरा विवाहसुद्धा अखेर मोडकळीस आला.

‘इम्रान’की किस्मत में तलाक
म जी क्रिकेटपटू आणि राजकारणी इम्रान खानचा दुसरा विवाहसुद्धा अखेर मोडकळीस आला. हा विवाह केवळ १0 महिनेच टिकू शकला. घटस्फोटाच्या दहाच दिवसांनतर त्याची पत्नी रहम हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विवाहानंतर तिला केवळ स्वयंपाक घरात राहा आणि बाहेर यायचे नाही, असे बजावण्यात आले होते, असे तिचे म्हणणे आहे. इम्रान हा ६२ वर्षांचा आहे तर रहम ही ४२ वर्षांची आहे. ती बीबीसीची टीव्ही पत्रकार असून तीन मुलांची आई आहे. इम्रानशी विवाहानंतर तिने नोकरी सोडली होती. ३0 ऑक्टोबर रोजी आपण वेगळे झाल्याचे त्यांनी जाहीर केले होते. इम्रानचा पहिला विावाह जेमिमा गोल्डसिमथ हिच्याशी झाला होता. तो नऊ वर्षे टिकला.