/> जर आपणास रोज कॉफी प्यायची सवय असेल तर तुमच्या डोळ्यांसाठी ती खुशखबर असू शकते. आहारतज्ज्ञांच्या मते, रोज एक कप कॉफी घेतल्याने नजर कमजोर होणे, मोतीबिंदू, रेटिना क्षतिग्रस्त होणे, मधुमेह यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. या डोळ्यांच्या अशा काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला अंधत्व येण्याचाही धोका असतो. कोरनेल विश्वविद्यालयातील आहार विज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या चांग वाई ली यांनी हे संशोधन केले असून त्यांनी रेटीना क्षतिग्रस्त होण्यापासून वाचवणारे मजबूत अँटी ऑक्सिडंट कॉफित असल्याचे सिद्ध केले आहे.