आदर्श व्यक्तींचाच असावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:01 IST2016-03-10T15:01:59+5:302016-03-10T08:01:59+5:30
बायोपिक तयार करण्यामागे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येतो
.jpg)
आदर्श व्यक्तींचाच असावा
भाग मिल्खा भाग, मेरी कोम, मांझी, नीरजा या चित्रपटांनी चांगली प्रशंसा मिळविली. विशेष म्हणजे, या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवरही खूप कमाई केली. यावर्षीही अनेक बायोपिक प्रदर्शित होणार आहेत. संजय दत्तची जेलमधून सुटका झाली अन् त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
या दरम्यान अनिल कपूरने माझा बायोपिक कोण पाहणार असा प्रश्न करून बायोपिकच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उभे केले. अशा स्थितीत तरुणाईला बायोपिक आवडतात का, व त्यांना कु णाचा बायोपिक पाहणे आवडेल याबाबची माहिती सीएनएक्सने जाणून घेतली. यावेळी बायोपिक हा आदर्श व्यक्त ींचाच असावा असे मत शहरातील तरुणाईने व्यक्त केले. बायोपिक तयार करण्यामागे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येतो. शिवाय त्या व्यक्तीच्या जीवनातील छुपा पैलू समोर आणण्याचे प्रयत्न यातून केले जातात.
महात्मा गांधी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला रिचर्ड अॅडनबेरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा चित्रपट उत्कृष्ट बायोपिक मानला जातो. या चित्रपटात बेन किंग्सले यांनी महात्मा गांधीची भूमिका साकारली होती. मनीरत्नम यांचा गुरू हा चित्रपट उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या जीवनपटाशी साम्य दर्शविणारा असला तरी तो केवळ चित्रपट आहे असे मनीरत्नम यांनी सांगितले आहे.
काही वर्षांपूवी आलेल्या आधी या चित्रपटाची कथा इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी साम्य दर्शविणारी असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती हे विशेष.
यावर्षी क्रिकेटर मोहमंद अझरुद्दीन याच्या जीवनावर ‘अझहर’ व महेंद्र सिंग धोनीवरील ‘धोनी’, पाकने दहशतवादी ठरविलेला पंजाबचा शेतकरी सबरजीत सिंग याच्यावरील सबरजीत हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची शहरातील तरुणाईलाही प्रतीक्षा आहे.