​इस्रायलमध्ये मानव ग्रंथालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 00:35 IST2016-02-25T07:35:08+5:302016-02-25T00:35:08+5:30

 इस्रायलमध्ये आता म्हणे लवकरच ह्युमन लायब्ररी आॅर्गनायझेशनच्यावतीने अनोखे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. 

Human Library in Israel | ​इस्रायलमध्ये मानव ग्रंथालय

​इस्रायलमध्ये मानव ग्रंथालय

ात ऐकावे ते नवलच! इस्रायलमध्ये आता म्हणे लवकरच ह्युमन लायब्ररी आॅर्गनायझेशनच्यावतीने अनोखे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाची खासियत म्हणजे येथे तुम्हाला पुस्तके नाही तर माणसं भेटणार.

या ह्युमन लायब्ररीमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या लोकांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समजा तुम्हाला लठ्ठपणा असलेल्या लोकांशी बोलयचे आहे किंवा निर्वासितांशी संवाद साधायचा असेल तर या ग्रंथालयात तुम्ही नोंदणी करू शकतात.

human library

सुमारे सोळा वर्षांपूर्वी २०००मध्ये डेन्मार्क देशात अशा लायब्ररीची सुरूवात करण्यात आली होती. आजतयागत ७० देशांमध्ये अशा प्रकारची मानवी ग्रंथालये उभारण्यात आली आहेत. समाजात काही विशिष्ट लोकांबद्दल असणारे अनेक गैरसमज, पूर्वाग्रह संवादाच्या माध्यमातून दूर होण्यासाठी ह्युमन लायब्ररी या उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

human library

मुक्तसंवादामुळे लोकांमध्ये सहिष्णूता, मैत्री, सकारात्मक दृष्टीकोन, सामाजिक आस्था निर्माण होते. विशेष म्हणजे यासाठी खर्चसुद्धा कमी आहे. केवळ स्वयंसेवकांची इच्छा आणि वेळ या दोन गोष्टींवर  कुठेही अशा प्रकारचे अनोखे गं्रथालय सुरू करणे शक्य आहे.

Web Title: Human Library in Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.