जेमीला विसरू कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:28 IST2016-01-16T01:12:28+5:302016-02-07T13:28:44+5:30

मॉडल केट मॉस आणि जेमी हिंस यांच्यात नुकताच घटस्फोट ...

How do I forget Jamie? | जेमीला विसरू कशी ?

जेमीला विसरू कशी ?

डल केट मॉस आणि जेमी हिंस यांच्यात नुकताच घटस्फोट झाला आहे. मात्र तरी देखील केट जेमीला विसरू शकली नाही. जेंव्हा जेमी मॉडल जेसिका स्टैम हिच्यासोबत फिरताना दिसला, तेंव्हा केटनी तिची नियोजित इबिसा यात्रा रद्द केली. घटस्फोटामुळे व्यथीत झालेल्या केटने मुलगी लायला व तिचा बॉयफ्रेंड जेफरसन हॅक याच्यासोबत इटलीला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेमीला जेसिकासोबत बघितल्याने तिने इटलीला जाणे रद्द केले.

कॅँपबेल दोषी
सुपरमॉडल नाओमी कॅँपबेल ही फोटोग्राफरला केलेल्या मारहाणीत दोषी आढळली आहे. २0१३ मध्ये बॉयफ्रेंडसोबत सुट्या सार्ज‍या करताना एका फोटोग्राफरने त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कॅँपबेल हिने फोटोग्राफरवर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यात कॅँपबेलला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत दोषी ठरविले गेले आहे.

शिल्पा-राजचा 'विवान' मोबाईल
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी आपल्या 3 वर्षीय मुलगा विवान याच्या नावाने मोबाईल फोन लाँच केला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिबेट्रींनी हजेरी लावली. शिल्पा मोबाईल फोन लाँच करताना म्हणाली, देशात मोबाईलची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही मोबाईल फोनच्या बाजारात उतरलो आहोत. राज कुंद्रा म्हणाला, विवान माझ्या नव्या व्यवसायाची प्रेरणा ठरला आहे. विवान फोन हा बाजारात असलेल्या फोनच्या तुलनेत वेगळा आहे. विचान हा मासेससाठी क्लास देणारा ठरणार आहे.

Web Title: How do I forget Jamie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.