हॉटेल आॅफ डूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:59 IST2016-02-24T15:59:47+5:302016-02-24T08:59:47+5:30

 प्योंगग्यांग शहरातील एक अर्धवट सोडून दिलेली इमारत ‘हॉटेल आॅफ डूम’ म्हणून ही इमारत ओळखली जाते. 

Hotel of Doom | हॉटेल आॅफ डूम

हॉटेल आॅफ डूम

्तर कोरिया सदैव नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत असतो. तेथील प्योंगग्यांग शहरातील एक अर्धवट सोडून दिलेली इमारत अलिकडे चर्चेचा विषय बनली आहे. ‘हॉटेल आॅफ डूम’ म्हणून ही इमारत ओळखली जाते.

1987 साली या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्याकाळातील सर्वात उंच हॉटेल म्हणून ‘ऱ्यूग्योंग हॉटेल’चे निर्माण करण्यात येते होते. 1989मध्ये इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही.

या प्रोजेक्टला पाठिंबा देणाऱ्या रशियाचे विभाजन झाल्यामुळे 1992 मध्ये या 105 मजली आणि 1083 फूट इमारतीचे काम रखडले. भग्नावस्थेतील ही जगातील सर्वात मोठी इमारत आहे. देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व देशाचे वैभव-संपन्नतेचे प्रतीक अशी किम संग द्वितीय यांची महत्त्वकांक्षा होती.

मात्र, या एकलखोर साम्यवादी राष्ट्राचे दु:स्वप्न म्हणूनच तिची ओळख बनली.

hotel doom

2008 मध्ये ‘ओरॅसकॉम’ या इजिप्शियन कंपनीने या हॉटेलच्या पुनर्वसनाचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यानुसार इमारतीच्या बाह्यभागात आरसे लावण्यात आले आहेत.

नवी माहिती अशी आहे की, आतून इमारतीमध्ये प्लंम्बिंग, वीज किंवा अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ एका मोठ्या गोदामासारखी ती आतून पोकळ आहे. पूर्णपणे रिस्टोर करण्यासाठी या इमारतीवर दोन बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Hotel of Doom