‘सेक्स टेप’ प्रकरणात होगनला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:13 IST2016-03-23T05:09:16+5:302016-03-22T22:13:47+5:30
फ्लोरिडाच्या एका कोर्टाने एक्स रेसलर हल्क होगनचा लिक झालेल्या सेक्स टेप प्रकरणाचा निकाल देताना संबंधित वेबसाइटला ११५ मिलियन डॉलरचा (७६० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
.jpg)
‘सेक्स टेप’ प्रकरणात होगनला न्याय
फ लोरिडाच्या एका कोर्टाने एक्स रेसलर हल्क होगनचा लिक झालेल्या सेक्स टेप प्रकरणाचा निकाल देताना संबंधित वेबसाइटला ११५ मिलियन डॉलरचा (७६० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. कोर्टाने वेबसाइट गॉकरला खासगी आयुष्यात ढवळा-ढवळ केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. सहा तास वाद-विवादानंतर ज्युरीने सांगितले की, हल्क होगनला मानसिक त्रास झाल्याने ६० मिलियन (३९८ कोटी रुपये) आणि इकोनॉमिक लॉससाठी ५५ मिलियन डॉलर (३६५) नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर हल्क होगनने लगेचच रडत वकीलाला मिठी मारली. न्यूयॉर्कच्या या वेबसाइटने ४ आॅक्टोंबर २०१२ मध्ये हल्क होगन आणि त्याच्या मित्राची पत्नी हीदर क्लेमचा सेक्ट टेप आॅनलाइन केला होता.