​जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:09 IST2016-02-18T09:09:52+5:302016-02-18T02:09:52+5:30

जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालये इतिहासात डोकावणं साºयांनाच आवडतं. युद्धाचा अभ्यास करण्याची ज्यावेळी वेळ येते, अशावेळी रक्तरंजित लढाया, सैनिकांची जिद्द, त्यांनी वापरलेली शस्त्रे, सैन्याची ताकद नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा इतिहास संग्रहालयाद्वारे जपला जातो आहे.  जगभरात अशी अनेक सैनिकी संग्रहालये आहेत. सैनिकांचे विश्व या संग्रहालयातून सामावले आहे. अशा सैनिकी संग्रहालयांची माहिती देत आहोत...

Historical Army museums around the world | ​जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालये

​जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालये

िहासात डोकावणं साºयांनाच आवडतं. युद्धाचा अभ्यास करण्याची ज्यावेळी वेळ येते, अशावेळी रक्तरंजित लढाया, सैनिकांची जिद्द, त्यांनी वापरलेली शस्त्रे, सैन्याची ताकद नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा इतिहास संग्रहालयाद्वारे जपला जातो आहे.  जगभरात अशी अनेक सैनिकी संग्रहालये आहेत. सैनिकांचे विश्व या संग्रहालयातून सामावले आहे. अशा सैनिकी संग्रहालयांची माहिती देत आहोत...
भारतीय युद्ध स्मृती संग्रहालय, दिल्ली
भारतीय युद्ध स्मृती संग्रहालय दिल्लीमधील लाल किल्ल्यात स्थापित आहे. पहिल्या आणि दुसºया विश्वयुद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीची माहिती या ठिकाणी मिळते. १५२६ साली पानिपत येथे झालेल्या युद्धाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. कट्यारी, गुप्ती, हत्यारे आणि शिरस्त्राणे ठेवण्यात आले आहेत. भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी पहावयाची असेल तर या संग्रहालयास भेट देणे आवश्यक आहे.
लेस इनव्हॅलीडस्, फ्रान्स
पॅरीस येथे लीहॉटेल नॅशनल इस इनव्हॅलीड्स हे मोठे कॉम्प्लेक्स आहे. फ्रेंच सैनिकी इतिहासासाठी हे समर्पित करण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रमुख रचना करण्यात आल्या आहेत. त्रिमीतीय पद्धतीने हे संग्रहालय बांधण्यात आले आहे. तीन रचनांमध्ये एक सैनिकी वापरासाठी, दुसरी इतिहासासाठी आणि तिसरी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीस्थळासाठी वापरली आहे. यात नेपोलियन बोनापार्टचाही समावेश आहे. यामध्ये रुग्णालय आणि निवृत्त सैनिकांसाठी निवासस्थानेही आहेत. 
रणगाडा संग्रहालय, अहमदनगर
रणगाडा संग्रहालय हे आशियामधील एकमेवाद्वितीय आहे. यात जुनी अशी घोस्ट रोल्स रॉईस आर्मर्ड कार (चिलखती गाडी) आहे. पहिल्या विश्वयुद्धादरम्यान वापरण्यात आलेले कॅम्ब्रियन सोमे आणि फ्लँडर्स हे देखील ठेवण्यात आले आहे. 
बंडस्वेअर मिलिटरी हिस्ट्री म्युझियम, ड्रेस्डन, जर्मनी
याला उभारणीसाठी सहा वर्षे लागली आणि ८६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च झाला. लोकांच्या माहितीसाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. ९८ फूट उंच, १४,५०० टन कॉक्रिटचा पिरॅमिड उभारण्यात आला आहे. १८५० साली किल येथे बांधण्यात आलेली पहिली जर्मन पाणबुडी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
नवल अ‍ॅव्हिएशन म्युझियम, गोवा
गोवा हे केवळ मौजमजा करण्याचे ठिकाण नाही. भारतीय नौसेनेचे संग्रहालय देखील पाहण्यासारखे आहे. या संग्रहालयात १३ एअरक्राफ्ट आहेत, त्याशिवाय अनेक शस्त्रे आहेत. 
जनरल जॉर्ज पॅटन म्युझियम, केंटुकी
अमेरिकेतील हे सर्वात मोठे म्युझियम आहे. शस्त्रास्त्रांच्या गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. जीप, ट्रक आणि रणगाडे यांच्यासोबतच अनेक वस्तूही आहेत. युद्धातील शस्त्रांमध्ये कशा पद्धतीने प्रगती होत गेली, हे या संग्रहालयात दाखविण्यात आले आहे.

Web Title: Historical Army museums around the world