शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

सुंदर, सतेज, तरुण दिसण्यासाठी मॉडेल हॅले बाल्डविन वापरते स्वत:च्याच रक्तानं तयार केलेलं क्रीम!

By admin | Published: May 15, 2017 3:31 PM

सौंदर्याचं राज : ‘व्हॅम्पायर फेशिअल’च्या मदतीनं हॅले बाल्डविननं आपलं वयही ठेवलंय ताजोतरार!

 - सलोनी सरगम

 
सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल, याचा खरंच काही नेम नाही. कोणी प्लास्टिक सर्जरी करतं, कोणी ट्रान्सप्लान्टेशन करतं तर कोणी काही. आता ही अमेरिकन मॉडेलच पाहा. सुंदरतेच्या हव्यासापोटी ती काय करीत असेल? आश्चर्य वाटेल, आपली कांती नितळ दिसावी यासाठी ती चक्क स्वत:च्याच रक्तापासून बनवलेलं क्रीम वापरते! 
या प्रसिद्ध मॉडेलचं नाव आहे हॅले बाल्डवीन! अर्थात असं करणारी ती काही पहिलीच मॉडेल, सुंदरी नाही. याआधी प्रसिद्ध रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअन हिनंही 2013मध्ये जाहीर केलं होतं, तिच्या सौंदर्याचं गुपित! तीदेखील आपल्या त्वचेच्या सुंदरतेसाठी स्वत:च्या रक्तापासून तयार केलेल्या क्रिमचा वापर करीत होती. तिच्या या खुलाशानंतर जगभर प्रचंड खळबळ उडाली होती. किम कर्दाशिअननंतर हॅले बाल्डविननं तिचाच कित्ता गिरवताना पुन्हा एकदा नव्यानं खळबळ उडवली आहे.
 
 
स्वत: हॅले बाल्डविननंच ‘लूक मॅगझिन’कडे हा खुलासा करताना सांगितलं, एका त्वचारोगतज्ञानं बनवलेलं लोशन मी माझ्या कांतीच्या सौंदर्यासाठी वापरते. हा तज्ञ नियमितपणे माझ्याकडे येतो. माझ्या हातातलं रक्त काढल्यानंतर एका मशीनमध्ये त्यावर प्रोसेसिंग केलं जातं. एका खास मशीनमधून ते फिल्ट केल्यानंतर त्यातून ब्लड सेल्स वेगळे काढले जातात. या प्रकाराला म्हणतात ‘व्हॅम्पायर फेशिअल’! 
हॅले बाल्डविन सांगते, मी माझ्या स्किनबाबत खरोखरच खूपच ‘सायको’ आहे आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार असते आणि माझ्या त्वचेची मी खूप काळजीही घेते. 
 
 
वीस वर्षीय सुंदरी हॅले बाल्डविन ही प्रसिद्ध अभिनेते स्टिफन बाल्डविन यांची मुलगी आहे. 
खरंतर हॅले बाल्डविनला व्हायचं होतं, प्रोफेशनल बॅले डान्सर, पण पायाला दुखापत झाल्यामुळे हे करिअर तिला अध्र्यावरच सोडावं लागलं आणि नंतर ती मेडिकल टर्मिनॉलॉजीकडे वळली. त्यानंतर तिला ओढ लागली ती मॉडेलिंगची आणि आता त्यातच ती करिअर करते आहे.
मॉडेलिंगच्या करिअरसाठी अर्थातच तुमच्या चेहर्‍याला आणि सौंदर्याला आत्यंतिक महत्त्व असतं. तुम्हाला कायम सतेज, सुंदर आणि तरुण राहावं लागतं. ती त्यासाठीची पहिली आणि बेसिक गरज आहे. त्यामुळेच हॅले बाल्डविननं आता आपलं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आधार घेतला आहे तो स्वत:च्याच रक्तापासून बनवलेल्या क्रीमचा.
 
 
त्याचा तिला किती फायदा झालाय?
आता हे मोजमाप आपण करण्यात काय फायदा?
हॅले बाल्डविन म्हणते या क्रिमचा मला प्रचंड फायदा झालाय आणि होतोय.
आता ती म्हणतेय, तर होतच असणार तिला फायदा! नाही का?.