रस्त्यावरच त्याने मिळवला जॉब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 05:28 IST2016-03-08T09:22:09+5:302016-03-08T05:28:34+5:30

कॅलिसनची सर्व कैफियत मार्टिनने फेसबुकवर पोस्ट केली. ती वाचून ‘पिज्झा रॉक्स’ हॉटेलमधून त्याच्यासाठी जॉब आॅफर आली. 

He got his job in the street ... | रस्त्यावरच त्याने मिळवला जॉब...

रस्त्यावरच त्याने मिळवला जॉब...

जागतिक मंदीच्या लाटेमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतान जर नोकरी नसेल तर कसे व्हायचे, या विवंचनेत अनेकजण ना उमेद होऊन जातात. पण फ्रेड्रिक कॅलिसन हताश झाला नाही.

वॉशिंग्टनमधील ‘स्मार्ट अँड फायनल’ दुकानासमोरील रस्त्यावर तो गेली दोन वर्षे बेघर म्हणून राहतोय. पण तो कोणी भिकारी नसून जॉबचा शोध घेत आहे.

आता तुम्ही म्हणाला जॉब शोधायचा तर आॅफिसेसला खेटा मारायच्या सोडून तो तिथे बसून काय करतोय? पण तो नुसता बसेलेला नव्हता. त्याचे रेझ्युमे व्यवस्थितपणे मांडून तो कोणीतरी त्याला नोकरी देईल या आशेवर वाट पाहत होता.

This homeless man was sitting outside of Smart and Final NOT asking for money. His sign said "Need work, and hungry" not...

Posted by Michael Marteen on Thursday, February 25, 2016


अखेर त्याचा आशावाद कामी आला. शॉपिंग करून बाहेर पडल्यावर मायकल मार्टिनला कॅलिसन रस्त्यावर रेझ्युमे मांडून बसलेला दिसला. उत्सुकते पोटी त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला त्याची परिस्थिती कळाली आणि त्याला मदत करण्याचे त्याने ठरवले.

मार्टिन सांगतो, केवळ एका स्लिपिंग बॅगवर तो राहत होता. ‘काम आणि अन्न पाहिजे’ असा बोर्ड त्याने लिहिलेला होता. एवढेच नाही तर त्याची सर्टिफिकेट्स, सोशल सेक्युरिटी कार्ड आणि ओळखपत्रदेखील समोर ठेवले जेणेकरून तो कोणी फ्रॉड नाही हे कळेल. तो आचारी होता. ‘सॅलव्हेशन आर्मी’साठी काम करण्यासाठी तो वॉशिंग्टनमध्ये आला होता. मात्र, काही कारणामुळे त्याला नोकरी सोडावी लागली आणि तो रस्त्यावर आला.

कॅलिसनची सर्व कैफियत मार्टिनने फेसबुकवर पोस्ट केली. ती वाचून ‘पिज्झा रॉक्स’ हॉटेलमधून त्याच्यासाठी जॉब आॅफर आली. हॉटेलने त्याला कपडे आणि एका मित्राने राहण्यासाठी तात्परुती जागा दिली. जीवनाला अशी सकारात्मक कलाटणी मिळाल्यामुळे कॅलिसन खूप खूश आहे. कोणाचे आयुष्य कसे वळण घेईल कोण सांगू शकेल, नाही का?

Web Title: He got his job in the street ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.