हार्ले-डेव्हिडसन हॉग रॅली गोव्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:17 IST2016-02-19T08:17:40+5:302016-02-19T01:17:40+5:30
‘बाईक वीक’च्या पार्श्वभूमीवर यंदा हार्ले-डेव्हिडसन बाईक मालकांची भव्यदिव्य हॉग रॅली यंदा गोव्यात पार पडली.

हार्ले-डेव्हिडसन हॉग रॅली गोव्यात
म सरूड फुटण्या आधीच मुलांना बाईकवर प्रेम जडलेले असते. कॉलेजमध्ये गेल्यावर ते प्रेम आणखीच रंगात येते. सुसाट वेगाने वाºयाशी स्पर्धा करण्याची ओढ सळसळत्या रक्ताला साजेशी असते. अशा या बाईकवेड्या पीढीची सर्वात आवडती बाईक म्हणजे हार्ले डेव्हिडसन.
‘बाईक वीक’च्या पार्श्वभूमीवर यंदा हार्ले-डेव्हिडसन बाईक मालकांची भव्यदिव्य हॉग रॅली यंदा गोव्यात पार पडली. हॉग इंडिया रॅलीचे यंदा चौथे वर्ष आहे. संपूर्ण भारतातून हार्ले डेव्हिडसन बाईक घेऊन हजारो लोक गोव्यात दाखल झाले होते.
हार्ले-डेव्डिसन इंडियाचे मार्केटिंग संचालक पल्लवी सिंग यांनी सांगितले की, ‘यंदाची रॅली आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली ठरली. स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि अॅडव्हेंचर अशा समान धाग्यांनी बांधलेले हजारो हार्ले प्रेमी हॉग रॅलीमध्ये सहभागी झाले.’
‘इंडियन बाईक वीक’चे निमित्त साधून यावर्षी भारतात दाखल होणाºया नवीन हार्ले बाईक्सचे अनावरण करण्यात आले. ज्यामध्ये नुकतीच लाँच झालेली स्पोर्टस्टर १२०० कस्टम आणि आयकॉनिक रोड किंग बाईक प्रदर्शन ठेवण्यात आली होती.
![rally]()