स्पेलिंग मिस्टेकमुळे हॅकरचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:41 IST2016-03-13T12:41:58+5:302016-03-13T05:41:58+5:30

 एनजीओच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे होते, हॅकर्सनी त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले. 

The hacker's failure due to a spelling mistake | स्पेलिंग मिस्टेकमुळे हॅकरचा डाव फसला

स्पेलिंग मिस्टेकमुळे हॅकरचा डाव फसला

ा स्पेलिंग मिस्टेकमुळे तब्बल 67 अब्ज रुपयांची चोरी टळली आहे. बांगलादेशच्या सेंट्रल बँक आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह यांच्यात पैशांचा आॅनलाईन व्यवहार सुरू होता. यावेळी हॅकर्सनी पेमेंट ट्रान्सफरशी संबंधित पासवर्ड चोरी केले.

या पासवर्डच्या मदतीने हॅकर्सनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला बांगलादेश बँकेच्या खात्यातून फिलिपाईन्स आणि श्रीलंकन बँकांच्या काही खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विनंती केली. फेडरल रिझर्व्हने पहिल्या चार विनंती स्वीकारत 10 कोटी डॉलर्स ट्रान्सफर केले होते. मात्र ज्या एनजीओच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे होते, हॅकर्सनी त्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले.



यानंतर फेडरल रिझर्व्हने ट्रान्सफर करण्याची प्रकिया थांबवत बांगलादेश सेंट्रल बँकेकडून स्पष्टीकरण मागितले. यातच चोरीचा उलगडा झाला. हॅकर्सनी एनजीओच्या नावात फाऊंडेशनऐवजी चुकीने फंडडेशन लिहिले होते.

Web Title: The hacker's failure due to a spelling mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.