मुलीच्या घरच्यांना भेटायला जाता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:48 IST2016-01-16T01:17:36+5:302016-02-07T07:48:43+5:30

जी आपली प्रेयसी आहे तीच आपली पत्नी व्हावी, असे प्रत्येकच प्रियकराला वाटत असते. परंतु जेव्हा प्रेमाला लग्नरुपी बंधनात अडकवण्याची वेळ येते तेव्हा टेन्शन वाढते...

Go to meet the girl's house ... | मुलीच्या घरच्यांना भेटायला जाता...

मुलीच्या घरच्यांना भेटायला जाता...

.
ारण एकच..तिचे पॅरेन्टस् मला अँक्सेप्ट करतील का, मला त्यांनी नकार दिला तर, त्यांना कसे इम्प्रेस करू असे अनेक प्रश्न डोक्याचा अगदी भूंगा करून टाकतात. तुम्हीसुद्धा अशाच फेझमधून जात असाल पुढील पाच गोष्टींवर नक्की लक्ष द्या.
  तिच्या आईवडिलांविषयी आधी जाणून घ्या
मुलीच्या आईवडिलांना भेटण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जाणून घेणे कधीही चांगले. त्यांना काय आवडते, त्यांचे छंद कोणते यांची माहिती असेल तर त्यांच्याशी बोलताना खूप गोष्टी सोप्या होतात.
 फस्र्ट इम्प्रेशन
प्रेयसीच्या पॅरेन्टस्ना भेटताना कोणते कपडे घालणार याक डे विशेष लक्ष द्या. स्वच्छ, इस्त्री केलेला नीटनेटका ड्रेस असावा. गबाळ कपड्यांमुळे पहिल्याच भेटीत तुमचे इम्प्रेशन वाईट पडेल. डार्क जीन्स, छान शर्ट आणि शूज सर्वात चांगला पर्याय आहे.
गिफ्ट घेऊन जा
कोणाच्याही घरी पहिल्या वेळी जाताना नेहमी काहीतरी गिफ्ट घेऊन जायला हवे. गिफ्ट काय घ्यायचा याचा विचार करण्यापेक्षा सरळ मुलीला विचारा की आई-बाबांचा स्पेशल डायट आहे का. बुकेपेक्षा चॉकेलेट किंवा इतर खाद्यपदार्थ न्यावेत.
 खोटा आव आणू नका
उगीच खोटा आव आणून पहिलीच भेट वाया घालू नका. नम्रपणे ऐकूण चर्चेत भाग घ्या. बोलण्यास स्वत:हून पुढाकार घ्या. तुमचे कुटुंब, नोकरी, आवडींविषयी बोला. पण चुकू नही राजकारण किंवा धर्माबद्दल बोलू नका.
  छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी
मुलीच्या आईवडिलांसोबत बोलत असताना फोन बंद करा. ते काय बोलतात याकडे पूर्ण लक्ष द्या. तुम्ही मुलीच्या किती प्रेमामध्ये आहात याचा पाढा वाचत बसू नका. कमी शब्दांत तुम्ही मुलीसाठी कसे योग्य आहात हे त्यांना पटवून द्या.

Web Title: Go to meet the girl's house ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.