मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:48 IST2018-08-22T16:44:19+5:302018-08-22T16:48:39+5:30
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्हालाही हे फ्लोरल प्रिंट भावलं असेल तर तुम्हीही बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे फ्लोरल प्रिंटचे वेगवेगळे ड्रेसेस कॅरी करू शकता.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला फ्लोरल प्रिंटचा व्हाइट ड्रेस आलियावर फार सुंदर दिसत आहे. तुमच्यावरही हा ड्रेस फार सुंदर दिसू शकतो.
जर तुम्हाला वाटत असेल कि फ्लोरल पॅटर्नमध्ये फक्त एथनिक वेअर चांगलं वाटतं तर तुमचा गैरसमज आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने घातलेल्या फ्लोरल प्रिंटच्या पिंक कलरच्या सलोनी ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
शिल्पा शेट्टी कुंद्रा नेहमी साड्यांसोबत वेगवेगळ्या एक्सपरिमेंट करताना दिसते. जर तुम्हीही फ्लोरल प्रिंटची साडी नेसण्याचा विचार करत असाल तर फ्लोरल प्रिंटच्या साडीमुळे तुम्हाला क्लासी लूक मिळू शकतो.
जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचं असेल तर तुम्ही फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणाऱ्या सोनम कपूरचा फ्लोरल गाउन ट्राय करू शकता. सोनम कपूरचा हा फ्लोरल गाउन राल्फ अन्ड रूसो यांनी डिझाइन केला आहे.
उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात लाइट कपडे घालण्यात येतात. गरम झालं किंवा कपडे भिजले तर पटकन सुकतील हा त्यामागचा उद्देश. असात तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीने घातलेला फ्लोरल ड्रेस घालू शकता.