फेसबुकमुळे गमवावा लागला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:52 IST2016-01-16T01:19:17+5:302016-02-09T11:52:25+5:30

इंग्लंडमधील एका दाम्पत्याला फेसबुकचा जबर झटका बसला.

Facebook lost due to the world | फेसबुकमुळे गमवावा लागला संसार

फेसबुकमुळे गमवावा लागला संसार

शल मीडियाचा उपयोग लोकांना जवळ आणण्याचा असतो. मात्र काही लोक याचा गैरफायदा घेतात. इंग्लंडमधील एका दाम्पत्याला याचा जबर झटका बसला.

बेकी आणि मार्क हिगीन्स नवीन घरामध्ये शिफ्ट होणार होते. राहत्या घरातील सर्व सामान व्यवस्थित पॅक करून नवीन फ्लॅटमध्ये नेण्यासाठी त्यांनी फेसबुकवरचे पेज पाहून दोन व्यक्तीची मदत घेतली. मात्र जोपर्यंत त्यांच्या लक्षात येईल तोपर्यंत त्या दोघांनी हिगीन्स दाम्पत्याचे सगळे सामान चोरी करून पोबारा केला.

मार्कने सांगितले की, 'फेसबुकवर त्या दोघांनी 'पॅकर्स आणि मुव्हर्स' कंपनीचे पेज बनविले होते. ते पाहून आम्ही त्यांना बोलावले.' तब्बल दहा लाख रुपये किंमतीचे सामान त्यांनी चोरले. ज्यामध्ये फर्निचर, कपडे, फोटोग्राफ, दागिन्यांचा सामावेश आहे. ज्यावेळी ते सामान पॅक करण्यासाठी आले तेव्हा त्यांची वागणूक अतिशय नम्र होती. एक एक करत सगळे सामान त्यांनी काळजीपूर्वक पॅक केले आणि निघून गेले. त्यानंतर ते दिसलेच नाही.

फेसबुकवरूनसुद्धा त्यांचे पेज डिलिट करण्यात आले आहे. या घटनेचा बेकीला फार मोठा धक्का बसला. ती म्हणते, 'त्या दोघांनी आम्हाला अगोदरच सर्व महत्त्वाच्या वस्तू नावानिशी बॉक्समध्ये पॅक करून ठेवण्याचे सांगितले होते. त्यावेळी आम्हाला काहीच शंका आली नाही.

Web Title: Facebook lost due to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.