ईवाचा खास ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:10 IST2016-01-16T01:07:27+5:302016-02-06T08:10:48+5:30
विक्टोरिया बेकहम करणार पोशाख डिझाईन फॅशन डिझायनर विक्टोरिया बेकहम ही तिची जवळची मैत्रिण असलेली अभिनेत्री ईवा लोंगोरिया हिच्या लग्नाचा पोशाख डिझाईन करणार आहे

ईवाचा खास ड्रेस
वा नव्या वर्षात बॉयफ्रेंड जॉश एंटोनियो याच्याशी लग्न करणार आहे. लग्नसराईतील कपडे डिझाईन करण्याचा व्यवसाय विक्टोरिया वाढविणार आहे. याअगोदर तिने अभिनेता टाइलर क्रिस्टोफर, फ्रांसचा बास्केटबॉल स्टार टोनी पार्कर यांच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते. आता ती ईवाच्या लग्नाचे कपडे डिझाईन करणार आहे.
कोल-हार्डन एकत्रच
अभिनेत्री कोल कर्दशिया आणि तिचा बास्केटबॉलपटू बॉयफ्रेंड जेम्स हार्डन अजूनही एकत्रच आहेत. ख्रिसमस दरम्यान हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाल्याची चर्चा होती. गेल्या मंगळवारी जेव्हा हार्डनची टीम ह्यूस्टन रॉकेट्सचा सामना अटलांट हॉक्स बरोबर होता, तेव्हा कोल हार्डनसोबत सामन्याच्या ठिकाणी पोहोचली होती. कोलचा पहिला पती लैमर ओडोम याला भेटण्यासाठी कोल हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेंव्हापासून हार्डन आणि कोल यांच्यातील नात्यात दरार पडल्याची जोरदार चर्चा होती.
न्यू ईयरचे नो प्लॅनिंग
ऑस्कर पुरस्कार विजेती जेनिफर लॉरेंस हिने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही खास नियोजन केले नाही. शिवाय ती कोणत्याही पार्टीत सहभागी होणार नाही. ब्रिटेनमधील एका टॉक शोमध्ये सहभागी झालेल्या जेनिफरला नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत विचारले असता, तिने मला हे आवडत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच रात्रभर नाच गाण्यात रममाण होण्यात अजिबात रस नसल्याचे ती सांगते.