इलेक्ट्रॉनिक सिगारेटनेसुद्धा कॅन्सर होण्याची दाट शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:07 IST2016-01-16T01:07:32+5:302016-02-06T07:07:06+5:30

 नवीन रिसर्च सिगारेटमुळे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. पण तरीसुद्धा सिगारेटचे व्यसन काही सुटत नाही. ई-सिगारेट (ईलेक्ट्रॉनिक सिगारेट) ही तंबाखुजन्य सिगारेटला पर्याय म्हणून ओळखली जाते मात्र तीसुद्धा धोकादायक आहे. नवीन रिसर्चनुसार ई-सिगारेटमुळेसुद्धा कॅन्सर होतो.

Electronic cigarettes also make chances of cancer ... | इलेक्ट्रॉनिक सिगारेटनेसुद्धा कॅन्सर होण्याची दाट शक्यता...

इलेक्ट्रॉनिक सिगारेटनेसुद्धा कॅन्सर होण्याची दाट शक्यता...

रयोगशाळेत केलेल्या विविध चाचण्यांचे परीक्षण केले असता असे दिसून आले की निकोटिन नसलेल्या ईलेक्ट्रॉनिक सिगारेट आपल्या पेशींना कॅन्सरसेल करतात.
पेशींना अशाप्रकारे हानी पोहचवतात की कॅन्सरची शक्यता वाढते. या संशोधनांच्या प्रमुख जेसिका वँग-रॉड्रिग्ज यांनी माहिती दिली की, 'अद्याप तरी सिगारेटला सुरक्षित पर्याय उपलब्ध नाही.' सॅन डियागो येथिल प्राध्यापिका जेसिका यांनी सांगितले की, आमच्या संशोधनातून सिद्ध होते की ईलेक्ट्रॉनिक सिगारेटची ज्यापद्धतीने सुरक्षित म्हणून जाहिरात केली जाते ती फसवी आहे. आम्ही के लेल्या प्रयोगात, दोन प्रसिद्ध ई-सिगारेट कंपन्यांच्या सिगारेटच्या धुव्याने पेट्री डिशेसमधील मानवी पेशींचा इलाज करण्यात आला.

Web Title: Electronic cigarettes also make chances of cancer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.