एडलेचे खासगी फोटो हॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 16:21 IST2016-03-22T23:20:47+5:302016-03-22T16:21:35+5:30
गायिका एडले सध्या एका हॅकरमुळे चिंतीत आहे. या हॅकरने तिचे काही खासगी फोटो चोरले असून, ते आॅनलाइन अपलोड केले आहेत. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा एडलेचा बॉयफ्रेंड सिमोन कोनेकी याचे ई-मेल अकाऊंट हॅक केले गेले.

एडलेचे खासगी फोटो हॅक
ग यिका एडले सध्या एका हॅकरमुळे चिंतीत आहे. या हॅकरने तिचे काही खासगी फोटो चोरले असून, ते आॅनलाइन अपलोड केले आहेत. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा एडलेचा बॉयफ्रेंड सिमोन कोनेकी याचे ई-मेल अकाऊंट हॅक केले गेले. एडलेच्या पाच महिन्याच्या गर्भावस्थेतील अल्ट्रासाउंड स्कॅनचे काही फोटो, गर्भवती सुपरस्टारची सेल्फी आणि एडलेची नवजात मुलीसोबत काढलेले काही फोटो हॅक झाले असून, हे सर्व फोटो सध्या फेसबुकवर शेअर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एडलेचे लहानपणीचे काही फोटो देखील आॅनलाइन करण्यात आले आहेत. यामध्ये तिचे काही खासगी फोटो देखील ्रअसल्याने एडले सध्या चिंतेत आहे. या प्रकरणाबाबत अजुनपर्यंत तिच्याकडून कोणीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.