सहा भारतीय मुलींची कर्तबगारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:03 IST2016-01-16T01:13:35+5:302016-02-07T13:03:48+5:30

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साऊ पाऊलो येथे झालेल्या 'वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन' मध्ये ८ पदक ...

Due to the hard work of six Indian girls | सहा भारतीय मुलींची कर्तबगारी

सहा भारतीय मुलींची कर्तबगारी

च वर्षी ऑगस्ट महिन्यात साऊ पाऊलो येथे झालेल्या 'वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन' मध्ये ८ पदक पटकावल्या नंतर आता भारताच्या सहा सुकन्या इंग्लंडमध्ये होणार्‍या 'युके स्किल्स शो'मध्ये सहभागी होणार आहेत. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत आयोजित ही स्पर्धा बर्मिंगहॅमच्या नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडणार आहे. विविध देशांचे स्पर्धक यामध्ये ब्युटी थेरपी आणि ज्वेलरी मेकिंगमध्ये आपले कौशल्य दाखविणार आहेत. सुमारे ७५ हजार लोक या कौशल्य आणि करिअर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटिश कौन्सिलच्य सौजन्याने आयोजित युके स्किल्स शो हा विद्यार्थ्यांसाठी नव्या गोष्टी शिकण्याची, जगात उपलब्ध नवीन करिअर आणि शिक्षणाचे विविध पर्याय शोधण्याचा फार चांगले व्यासपीठ आहे. कौशल्य विकास आणि स्वयंउद्योजकता मंत्रालयाचे मंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाले की, 'गेल्या एका वर्षापासून आमचे मंत्रालय कौशल्य विकासावर भर देत असून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतीय युवकांमध्ये असणार्‍या उपजत टॅलेंटला जगासमोर मांडण्याची 'युके स्किल्स शो' ही फार चांगली संधी आहे. ज्या कारणाने जगाला कळेल की आपल्या देशातही कौशल्यपूर्ण नागरिक आहेत.'
ते पुढे म्हणाले की, 'भारतीय युवकांना त्यांचे कौशल्य आणखी विकसित करण्यासाठी योग्य ती संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे हा शो फार महत्त्वाचा आहे. तरुणांना नेहमीपेक्षा काही तरी वेगळे, काही तरी भन्नाट करण्याची प्रेरणा देणारे याप्रकारचे कार्यक्रम वारंवार घेतले गेले पाहिजेत.'


 

Web Title: Due to the hard work of six Indian girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.