एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वाढते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 19:36 IST2016-08-13T14:06:15+5:302016-08-13T19:36:15+5:30

एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वेगाने वाढते, यामुळे स्किझोफ्रेनिया लढता येते. स्किझोफ्रेनियाशी दोन हात करताना एअरोबिक्समुळे मदत होते.

Due to aerobics, brain activity increases | एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वाढते

एअरोबिक्समुळे मेंदूचे कार्य वाढते

रोबिक्समुळे मेंदूचे कार्य वेगाने वाढते, यामुळे स्किझोफ्रेनिया लढता येते. स्किझोफ्रेनियाशी दोन हात करताना एअरोबिक्समुळे मदत होते, असे मँचेस्टर विद्यापीठाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. १० वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये ३८५ स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

संशोधक जोसेफ फिर्थ यांनी १२ आठवडे या रुग्णांना एअरोबिक्सचे प्रशिक्षण दिले. त्यांनतर त्यांच्या मेंदूचे कार्य कशापद्धतीने चालते याची तपासणी केली. तथापि अनेक रुग्णांची स्मरणशक्ती खूपच कमी असल्याने तसेच एखाद्या गोष्टीवर एकाग्रता करण्यासाठी त्यांच्यावर फारसा प्रभाव पडला नसल्याचेही जाणवले.

या संशोधनानुसार ज्या रुग्णांनी एअरोबिक्सचा व्यायाम केला, त्यांच्या मेंदूचे कार्य केवळ औषधांद्वारे उपचार करणाºया रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढते असेही जाणवले. 

रुग्णांना सामाजिक जाणिवा, त्यांचे लक्ष्य देण्याचे कार्य आणि काम करण्याची स्मरणशक्ती ही कामे चांगल्यापद्धतीने चालू असल्याचे लक्षात आले. या संशोधनात काही तथ्येही आढळली. ज्या रुग्णांनी अधिक प्रमाणात व्यायाम केला आणि आपला फिटनेस वाढविण्यासाठी ज्यांनी अधिक प्रयत्न केला,  त्यांचे मानसिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे लक्षात आले. मानसिक आजार हा स्किझोफ्रेनियाचे मुख्य लक्षण असून, कामाच्या ठिकाणी अथवा सामाजिक कामात त्यांना झोकून देता येत नाही.

Web Title: Due to aerobics, brain activity increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.