धोनी फुटबॉलच्या मैदानात; धडकचा हिरो इशान खट्टरबरोबर लूटला खेळाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 20:52 IST2018-07-26T20:52:07+5:302018-07-26T20:52:57+5:30
भारतात आल्यावर त्याने मुंबईतील वांद्रे परीसरातील ऑल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये आपली हजेरी लावली. त्यावेळी या क्लबमध्ये बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही फुटबॉल खेळण्यासाठी आली होती.

धोनी फुटबॉलच्या मैदानात; धडकचा हिरो इशान खट्टरबरोबर लूटला खेळाचा आनंद
मुंबई : भारताचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा सराव करण्यात व्यस्त आहे. पण भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र फुटबॉलच्या मैदानात उतरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धडक चित्रपटातील नायक इशान खट्टरबरोबर त्याने आज फुटूबॉलचा आनंद लूटला.
धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. त्यामुळे तो इंग्लंडहून भारतात परतला. भारतात आल्यावर त्याने मुंबईतील वांद्रे परीसरातील ऑल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये आपली हजेरी लावली. त्यावेळी या क्लबमध्ये बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी धोनीनेही मैदानात उडी घेत खेळाचा आनंद लुटला.
धोनी हा फुटबॉलप्रेमी आहे. यापूर्वीदेखील धोनीने आपले फुटबॉलप्रेम दर्शविले आहे. 2017 साली सेलिब्रेटींचा एक फुटबॉल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यातही धोनी खेळला होता.