शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Deepika Ranveer Wedding : दीपिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल; ब्राइडल लूकपेक्षा चुनरीकडे सर्वाचं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 19:14 IST

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी इटलीतील लेक कोमो येथे आपली लग्नगाठ बांधली. दोघांनी आधी कोंकणी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने लग्न केलं.

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी इटलीतील लेक कोमो येथे आपली लग्नगाठ बांधली. दोघांनी आधी कोंकणी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने लग्न केलं. दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नामध्ये बॉलिवूडचा सर्वात फेव्हरेट डिझायनर सब्यासाची मुखर्जींचे आउटफिट्स परिधान केले होते. ज्वेलरीपासून लहेंग्यापर्यंत आणि साडी, कुर्ता आणि शेरवानीपर्यंत सर्व आउटफिट्स सब्यासाची यांनी डिझाइन केलेले होते. याआधी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नसमारंभामध्ये मेहंदी, साखरपुडा, लग्न आणि रिसेप्शनमध्येही सब्यासाची यांनी डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान केले होते. 

दीपिकाच्या या सुंदर लहेंग्यापेक्षा सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खास ठरली ती म्हणजे तिची चुनरी. अत्यंत खासगीत पार पडलेल्या या सोहळ्याचे फक्त दोनच फोटो सर्व फॅन्ससाठी शेअर करण्यात आले होते. हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. परंतु हे फोटो शेअर होताच सर्वांमध्ये चर्चा सुरू झाली ती म्हणजे दीपिकाच्या ओढणीची. तिच्या ओढणीवर 'सदा सौभाग्यवती भव: !!' असं लिहिण्यात आलं होतं. 

दीपिकाने डोक्यावर घेतलेली ही ओढणी नवरीला तिच्या सासरच्या लोकांकडून देण्यात येते. या व्यतिरिक्त दीपिकाचे कलिरे, चुडा आणि साखरपुड्याच्या अंगठीचीही चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे रिसेप्शन बंगळुरू आणि मुंबईमध्ये होणार आहे. इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न केल्यानंतर दीपिका बंगळुरूमध्ये 21 नोव्हेंबर आणि मुंबईमध्ये 28 नोव्हेंबरला रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

टॅग्स :Deepveerदीप- वीरDeepika Padukoneदीपिका पादुकोणRanveer Singhरणवीर सिंगbollywoodबॉलिवूड