​‘मेड इन अमेरिके’चा प्रयोग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:20 IST2016-03-12T09:20:28+5:302016-03-12T02:20:28+5:30

 ‘मॅरिएट इंटरनॅशनल’ कंपनीने हॉटेल्समध्ये केवळ अमेरिकेत तयार झालेले टॉवेल वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Continuing use of 'Made in America' | ​‘मेड इन अमेरिके’चा प्रयोग सुरू

​‘मेड इन अमेरिके’चा प्रयोग सुरू

रतामध्ये सध्या ‘मेड इन इंडिया’चे वारे वाहू लागले असताना अमेरिकतही ‘मेड इन अमेरिके’चा प्रयोग सुरू झाला आहे. ‘मॅरिएट इंटरनॅशनल’ कंपनीने त्यांच्या सर्व तीन हजार हॉटेल्समध्ये केवळ अमेरिकेत तयार झालेले टॉवेल आणि पायपुसणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्टँडर्ड टेक्स्टाईल’ कंपनीशी यासंदर्भात करार करण्यात आलेला असून त्यानुसर शंभर टक्के कॉटन फायबरचे दरवर्षी २६ लाख बाथरूम टॉवेल्स आणि ४९ लाख हात पुसण्याचे टॉवेल्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मॅरिएट हाटेल्समध्ये यापूर्वी जॉर्डनमध्ये टेरी कापडापासून तयार झालेले टॉवेल वापरत असत.

‘आमच्या या निर्णयामुळे १५० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्वदेशी व्यावसायाला चालना मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे,’ असे मॅरिएट हॉटेलच्या चेयरमन बोर्डाचे अध्यक्ष बिल मॅरिएट म्हणाले.

Marriott Hotels

स्टँडर्ड टेक्सटाईलने ११० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतले असून लवकरच आणखी ४० जणांना कामावर घेतले जाणार आहे. तसेच दरवर्षी विदेशातून टॉवेलची आयात करताना जहाजांच्या तीनशे फेऱ्यांतून होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनालादेखील आळा बसेल.

अमेरिकेत चालू असलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुक प्रचारामध्ये स्वदेशी उत्पादनावर भर देऊन ‘मेड इन अमेरिका’द्वारे नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रमुख मुद्दा आहे. त्याधर्तीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे इतर कंपन्यादेखील पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Continuing use of 'Made in America'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.