नाईट पार्टीसाठी ड्रेसची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 05:01 IST2016-03-12T12:01:50+5:302016-03-12T05:01:50+5:30

 तुमचे संपूर्ण लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीचा आनंद घेता येत नाही. 

Choose the dress for the night party | नाईट पार्टीसाठी ड्रेसची निवड

नाईट पार्टीसाठी ड्रेसची निवड

ong>एखाद्या पार्टीत परिधान केलेल्या कपड्यांमध्ये खूप अवघडल्यासारखे होते. अशावेळी तुमचे संपूर्ण लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीचा आनंद घेता येत नाही. पार्टीला जाताना अशा ड्रेसची निवड करा

- रात्री उशिरा नाईटआऊट करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर हाय हिल्स अजिबात वापरू नका. कारण अशावेळी खूप चालणे होते. यामुळे फ्लॅट चप्पलचा पर्याय चांगला आहे. 

- लांब आणि मोठा ड्रेस वापरू नका. पार्टीदरम्यान तो कोठेतरी अडकून खराब होण्याची किंवा कोणी पाय देऊन तो घाण करण्याची शक्यता असते. 

- घट्ट कपडे परिधान करू नका. सैलसर आणि फॅशनेबल कपडे घाला. घट्ट ड्रेस घातल्याने तुम्हाला श्वास घेण्यात आणि चालण्यातही त्रास होईल. 

- डेनिम आणि टॉपही तुम्हाला रिच पार्टी लूक देतात. तुमच्या आउटफिटवर सूट होणारी अशी लहान पर्स निवडा. मोठी वजनदार पर्स घेवू नका. पार्टीदरम्यान सांभाळायला ती खूप त्रासदायक होते.

Web Title: Choose the dress for the night party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.