​वर्णभेदी फोटो लेन्समुळे ‘स्नॅपचॅट’वर चौफेर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:54 IST2016-08-12T12:24:38+5:302016-08-12T17:54:38+5:30

‘यलो फेस’ नावाचा लेन्स वर्णद्वेषी असून आशिया खंडात राहणार्‍या लोकांच्या चेहर्‍याच्या रंगाच्याबाबतीत प्रचलित गैरसमजुतीला प्रोत्साहन देणारा आहे,

Chapar Chakra on 'Snapshot' due to colorful photo lens | ​वर्णभेदी फोटो लेन्समुळे ‘स्नॅपचॅट’वर चौफेर टीका

​वर्णभेदी फोटो लेन्समुळे ‘स्नॅपचॅट’वर चौफेर टीका

गवेगळ्या फोटो लेन्ससाठी यूजर्समध्ये प्रसिद्ध असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप ‘स्नॅपचॅट’ला सध्या चौफर टीकेचा सामना करावा लागत आहे. ‘यलो फेस’ नावाचा लेन्स वर्णद्वेषी असून आशिया खंडात राहणार्‍या लोकांच्या चेहर्‍याच्या रंगाच्याबाबतीत प्रचलित गैरसमजुतीला प्रोत्साहन देणारा आहे, असे म्हटले जातेय. त्यामुळे कंपनीने तात्काळ हे लेन्स मागे घेतले अशी चुक पुन्हा होणार नाही अशी ग्वाहीदेखील दिली.

‘यलो फेस’ लेन्सद्वारे यूजरच्या चेहर्‍याला गंमतीशीर कार्टूनचा इफेक्ट देण्यात येतो. तिरळे डोळे, रुंद गाला आणि बाहेर आलेले दात असा इफेक्ट या लेन्समध्ये देण्यात येत असे. मंगळवारी ते उपलब्ध करून देण्यात आल्यावर सोशल मीडियावर याविरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या.

अत्यंत गाफिल राहून आशियाई लोकांच्या रंगाचा उपहास करणारा लेन्स ‘स्नॅपचॅट’ने लाँच केला आहे, अशा स्वरुपाचे ट्विटस केले जात होते. मुद्दामहून असो वा अनावधानाने, अशी चुक टाळता येऊ शकली असती असाच नेटिझन्सचा सूर होता.

वाढता रोष पाहता कंपनीने लेन्स डिअ‍ॅक्टिव्हेट करून अशा प्रकारचा वर्णद्वेषी लेन्स पुन्हा लाँच करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. बरं कंपनीवी अशा प्रकारची टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बॉबा मार्ले लेन्समुळेदेखील कंपनीवर वर्णभेद करण्याची टीका झाली होती.

Web Title: Chapar Chakra on 'Snapshot' due to colorful photo lens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.