सेलिब्रिटी मास्टरशेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2016 11:33 IST2016-01-16T01:08:55+5:302016-02-02T11:33:25+5:30
सेलिब्रिटी मास्टरशेफ मास्टरशेप आणि मास्टरशेफ ज्युनियर या शोच्या यशानं...

सेलिब्रिटी मास्टरशेफ
म स्टरशेप आणि मास्टरशेफ ज्युनियर या शोच्या यशानंतर फॉक्स आता 'सेलिब्रिटी मास्टरशेप' हा नवा शो घेऊन येत आहे. या शोमध्ये टैरी क्रियुज आणि गिगी हैडिड यांच्यासारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या शोमध्ये सेलिब्रिटींना आमने-सामने उभे रहावे लागणार आहे. हैडिडचा मुकाबला डेवोन विंडसर याच्याशी असेल तर क्रियूज आणि त्याची पत्नी रेबेका क्रियूज यांचा बोरिस कोडजो आणि निकोल एरी पार्कर यांच्याशी मुकाबला होणार आहे.
मॉर्गनचा पुनर्जन्म
हास्य कलाकार ट्रेसी मॉर्गन म्हणतो की, जुन २0१४ मध्ये झालेल्या अपघातातून मी केवळ माझी पत्नी मेगन वूलओवर आणि मुलगी यांच्या प्रेमापोटी जिवंत राहिलो. तो म्हणतो, या अपघातात जवळपास माझा मृत्यू झाला होता. मात्र देवाजवळ मला जिवंत ठेवण्याचे कारण असल्याने आज मी तुमच्यासमोर उभा आहे. या अपघातात मॉर्गनच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. शिवाय त्याचा एक पायही तुटला होता. या अपघातात त्याचा मित्र जेम्स मैकनायर याचा मृत्यू झाला होता.
केटीची हिलरींशी भेट
अभिनेत्री केटी होम्सने न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमात हिलरी क्लिंटन यांची भेट घेतली. याबाबतचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती हिलरी आणि त्यांची मुलगी चेल्सी यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी केटीची मुलगी सूरी क्रू सुद्धा तिच्यासोबत होती. केटीने या फोटोला 'मदर्स एंड डॉटर्स' असे शीर्षक दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या रेसमध्ये पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पार्टीतर्फे हिलरी क्लिंटन यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे.