व्हाईट हाऊसमध्ये गुरुनानक जयंती साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:26 IST2016-01-16T01:09:34+5:302016-02-05T05:26:22+5:30
शीख बांधवांसह ओबामा प्रशासनातील काही बड्या अधिकार्यांच्या उपस्थित व्हाईट हाऊसमध्ये शीख धर्माचे संस...

व्हाईट हाऊसमध्ये गुरुनानक जयंती साजरी
श ख बांधवांसह ओबामा प्रशासनातील काही बड्या अधिकार्यांच्या उपस्थित व्हाईट हाऊसमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. ओबामांच्या वरिष्ठ सल्लागार वॅलेरी ज्रेट यांनी यावेळी सांगितले की, 'राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना शीख समुदायाबाबत नितांत आदर असून अमेरिकेत शीखांना घाबरण्याची काहीही गरज नाही.' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक कार्यक्रमांचे सहसंचालक जेस मूर यांनी शीख समुदायातील पाहुण्यांचे स्वागत 'हॅपी गुरपरब' असे म्हणून केले. उपस्थित सर्व शीख समुदायाने यावर जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यानंतर न्यू जर्सी येथील मनप्रीत सिंग आणि रघुबीर सिंग यांनी पारंपरिक वाद्य वाजवून पंजाबी भजन गायिले.
'शीख काऊंन्सिल ऑन रिलिजन अँण्ड एज्युकेशन' संस्थेचे संचालक डॉ. राजवंत सिंग म्हणाले की, 'ओबामा यांच्या टीमने दाखवलेला सहकार्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. यामुळे संपूर्ण जगात एक सकारात्मक संदेश नक्कीच जाईल.'