'कुशल फॅशन'च्या सिल्व्हर ज्वेलरीसह अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत साजरी करा गणेश चतुर्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:54 IST2025-08-25T18:53:45+5:302025-08-25T18:54:36+5:30

उत्सवासाठी एक उत्कृष्ट प्राचीन संग्रह!

Celebrate Ganesh Chaturthi with Kushals Fashion's silver jewellery and actress Hruta Durgule | 'कुशल फॅशन'च्या सिल्व्हर ज्वेलरीसह अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत साजरी करा गणेश चतुर्थी

'कुशल फॅशन'च्या सिल्व्हर ज्वेलरीसह अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत साजरी करा गणेश चतुर्थी

भारतातील सर्वात लोकप्रिय फॅशन आणि चांदीच्या दागिन्यांचा ब्रँड म्हणजे कुशल्स... महिलांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगासाठी हा ब्रँड नेहमीच नवनवीन डिझाइन ऑफर करतो. ऑफिसवेअर, रोजच्या जीवनातील निखळ सौंदर्य, उत्सवाच्या एक्सेसरीज आणि लग्नाच्या भव्यतेपर्यंतच्या अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. प्रीमियम मटेरियल, चमकदार रंगीत स्टोन आणि बीआयएस हॉलमार्क केलेले ९२.५ स्टर्लिंग सिल्व्हर वापरून बनवलेले दागिने हे कुशलच्या फॅशन ज्वेलरी परंपरेचं आणि आधुनिकतेचं मिश्रण आहे. गणेशोत्सव जवळ येत असताना कुशलने महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत भागीदारी करून त्यांचा लेटेस्ट संग्रह लाँन्च केला आहे. 

बाप्पाच्या स्वागतासाठी डिझाइन केलेले हे दागिने प्रीमियम हँडफिल आणि हलक्या वजनाचं मिश्रण आहेत. या श्रेणीमध्ये चंद्रकोर आणि फुलांचे नमुने - जे ज्ञान, समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहेत. तसेच प्रत्येक उत्सवाच्या कार्यक्रमात कायमची छाप सोडण्यासाठी डिझाइन केलेले अलंकृत हार, स्टेटमेंट फिंगर रिंग्ज आणि बोल्ड कडे यासारख्या ट्रेंडिंग शैलींचा समावेश आहे.

या जाहिरातीचा चेहरा असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे परंपरा आणि आधुनिकता सुंदरपणे दाखवते. जाहिरातीच्या दृश्यांमध्ये हृता एक स्टेटमेंट चोकर घालते, जी पारंपारिक चंद्रकोर डिझाइन, एक प्रिय महाराष्ट्रीयन प्रतिक, एका नाजूक आधुनिक फुलांच्या पॅटर्नसह बनवली आहे. अँटीक फिनिश त्याला एक राजेशाही टच देतो, जो उत्सवासाठी अगदी योग्य आहे. ड्रॉप इअररिंग्ज, नक्षीकाम केलेल्या गणेश डिझाईनच्या सुंदर अंगठ्या आणि गडद हिरव्या आणि माणिक रंगाच्या रत्नांनी सजवलेल्या कड्यानी तिचा लूक पूर्ण केला आहे. दागिन्यांचा प्रत्येक तुकडा दागिन्यांची कलात्मकता प्रतिबिंबित करून समकालीन स्टाइलिंगसाठी नवीन आणि योग्य दिसतो.

प्राचीन सोन्याचा मुलामा दिलेल्या फिनिशमध्ये बनवलेले, हे कलेक्शन समृद्धता आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतं, जे पूजा, कौटुंबिक सोहळे आणि उत्सवांसाठी आदर्श आहे. ते सिल्क साड्या, पैठणी, क्लासिक नऊवारी ड्रेप्स किंवा सुंदर उत्सवी लूकसाठी एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट आणि फ्लोई स्कर्ट सारख्या इंडो-वेस्टर्न पोशाखांसोबत किंवा समकालीन ट्विस्टसाठी घालता येतं. 

पुण्यात ६ स्टोअर्स आणि संपूर्ण भारतात १०० हून अधिक स्टोअर्स असलेलं कुशल हे प्रत्येक प्रसंग आणि शैलीला अनुकूल असलेल्या बहुमुखी फॅशन आणि चांदीच्या दागिन्यांसाठी अगदी योग्य ठिकाण आहे. हे कलेक्शन स्टोअर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदी करा: https://www.kushals.com/collections/ganesha-jewellery-collection
 

Web Title: Celebrate Ganesh Chaturthi with Kushals Fashion's silver jewellery and actress Hruta Durgule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.