आर्टिफिशिअल ज्वेलरीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:56 IST2016-03-10T14:56:27+5:302016-03-10T07:56:27+5:30

मेटल नेकपिस असतील तर ते वापरताना विषेश काळजी घ्यायला हवी.

Care of artificial jewelery | आर्टिफिशिअल ज्वेलरीची काळजी

आर्टिफिशिअल ज्वेलरीची काळजी

काल ब-याच ठिकाणी अ‍ॅक्सेसरिज स्वस्तात मिळतात, पण एक- दोन वापरात असे लक्षात येते की यांचा रंग किंवा चकाकी निघून गेलेली असते. एकतर यात स्वस्तात बनवलेल्या असतात. जर मेटल नेकपिस असतील तर ते वापरताना विषेश काळजी घ्यायला हवी. यासाठीच्या काही टीप्स...

- ब-याच जणांना मानेभोवती घाम येतो. अशा वेळी घामामुळे या नेकपिसच्या मानेकडील भागाचा रंग पटकन जातो. त्यामुळे असे असेल तर नेकपीस वापरणं टाळा, 

- आर्टिफिशिअल ज्वेलरींना पाणी लागू देऊ नका. असे केल्याने त्यांचा रंग किंवा पॉलिश निघून ज्याण्याची शक्यता असते.

- इमिटेशन ज्वेलरीचा सेट असेल तर सहा एक महिन्यांनी त्यातले दागिने पॉलिश करून घ्या. जरी तुम्ही हे दागिने फारसे वापरात नसले तरी ते पॉलिश करून घ्या. 

- हल्ली व्हाईट मेटल किंवा आॅक्झिडाईज ज्वेलरीचा ट्रेंड आहे. हे दागिने शक्य असल्यास बेबी शॅम्पूनं धुवून व्यवस्थित कोरडे करून घ्या.

Web Title: Care of artificial jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.